Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • प्राचार्यांच्या मारहाणीने व्यथित विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप
Top News

प्राचार्यांच्या मारहाणीने व्यथित विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप

Student suicide

Student suicide : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलाबराव देवकर महाविद्यालयातील फार्मसीच्या (Gulabrao Deokar Pharmacy College Jalgaon) दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी श्याम प्रभाकर पाटील (Student Shyam Prabhakar Patil) (वय १९ वर्षे रा. बोदवड) याने गळफास घेऊन आत्महत्या (Student commits suicide by hanging) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राचार्य योगेश पवार यांनी सर्वांसमोर पीव्हीसी पाइपने मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्याने, मानसिक त्रास सहन न झाल्याचा उल्लेख त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये (Crime against principal based on suicide note) केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम पाटील हा जळगावात त्याच्या मित्रांसोबत राहून शिक्षण घेत होता. मात्र, मित्र गावाकडे गेले होते आणि तो खोलीत एकटाच होता. सायंकाळी सुमारास त्याने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी जप्त केली.

अपमानाची वेदना चिठ्ठीत व्यक्त

मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात श्यामने नमूद केले आहे की, कोणतीही चूक नसताना प्राचार्यांनी सर्व शिक्षक आणि मित्रांसमोर त्याला मारहाण केली व शिवीगाळ केली. मित्रांतील भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलो असताना समोरच्या विद्यार्थ्याने बाहेरील मुलांना बोलावले, तरी त्याच्यावर कारवाई झाली नाही; उलट मला पीव्हीसी पाइपने मारण्यात आले, असा आरोप त्याने केला आहे. “गुरू मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही,” अशी वेदनादायक नोंदही त्याने केली आहे. पत्राच्या शेवटी मित्राला उद्देशून भावनिक संदेशही लिहिला आहे.

पालकांचा आक्रमक पवित्रा

घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय रुग्णालयात नातेवाईक व पालकांनी गर्दी केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका होतकरू विद्यार्थ्याला प्राचार्यांच्या जाचाला कंटाळून जीव गमवावा लागल्याची भावना व्यक्त करत वर्गमित्रांनीही संताप व्यक्त केला.

प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत विद्यार्थ्याचे वडील प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts