Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • students food poisoning : समोसा तळताना तेलात पडला कापूर; 15 ते 16 विद्यार्थ्यांना झाली विषबाधा
गुन्हा

students food poisoning : समोसा तळताना तेलात पडला कापूर; 15 ते 16 विद्यार्थ्यांना झाली विषबाधा

students food poisoning – घाटकोपर येथील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील 15 ते 16 विद्यार्थ्यांनी शाळेतील कँटीन मधील सामोसा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.कँटीन मध्ये सामोसा खाणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

घाटकोपर परिसरात असलेल्या एका शाळेमध्ये सकाळच्या सुमारास कँटीन मध्ये सामोसा खाणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. कारण सामोसा खाल्ल्यामुळे 15 ते 16 विद्यार्थीनींना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेले विद्यार्थी इयत्ता पाचवी ते आठवीतील असल्याची माहिती समोर अली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅन्टीनमध्ये नेहमी प्रमाणे समोसा खाला होता. परंतु त्यानंतर त्यांना उलट्या झाल्या. हा घडलेला संपूर्ण प्रकार समजल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा – जादूटोण्याचा धाक दाखवत भोंदूबाबाने केला महिलेवर १४ वर्ष लैंगिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या मुख्याद्यापिकेने सांगितले कि, सामोसा खाताना त्यांना कपूरचा वास आला होता. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कँटीनमध्ये जाऊन सामोसा खाण्याबद्दल सांगितले होते.त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे सामोसे खाल्ले त्यामध्ये शिळ्या भाजीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परंतु आणखी एका अपडेट नुसार सामोसे तळण्या आलेल्या तेलात देवाजवळ ठेवलेला कापूर पडल्याने ही दुर्घटना घडली. या बाधित विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पालकांकडून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

शाळेच्या प्राचार्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याकडून सामोसा तळत असताना चुकून देवाजवळील कापूर तेलात पडला. आणि हेच समोसे विद्यार्थ्यांनी खाल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी महापालिकेच्या डॉक्टरांना बोलावून विद्यार्थ्यांना तपासले असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता सर्वांची तब्येत स्थिर असल्याची माहिती शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांनी दिली. (students food poisoning)

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts