Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ज्या शिक्षकावर भविष्य घडवण्याची जबाबदारी दिली, त्यानेच ३ चिमुकल्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं
Top News

ज्या शिक्षकावर भविष्य घडवण्याची जबाबदारी दिली, त्यानेच ३ चिमुकल्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं

teacher ruined lives of three girls

teacher ruined lives of three girls : बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana Crime News) शिक्षण क्षेत्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या गुरुला समाजाचा आधारस्तंभ आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा शिल्पकार मानले जाते, त्याच गुरुने माणुसकीला काळिमा फासली आहे. मेहकर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील (ZP School) 57 वर्षीय शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या ३ चिमुकल्या मुलींशी अश्लील वर्तन (Obscene behavior towards girls) केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – सोलापूरचा डंका जगभरात! एमपीएससीत विजय लामकाने राज्यात पहिला, तर आरती जाधव महिलांमध्ये प्रथम

जिल्हा परिषद शाळेतील घृणास्पद प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या लोणी गवळी जिल्हा परिषद शाळेत हा घृणास्पद प्रकार घडला आहे. महादेव आत्माराम मानतोडे असे नरामधम शिक्षकाचे नाव आहे. ज्याच्यावर चिमुकल्यांना घडवण्याची जबाबदारी होती, त्यानेच पालकांच्या विश्वासाला तडा दिलाय. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींशी या शिक्षकाने अश्लील वर्तन केले. विशेष म्हणजे हा आरोपी शिक्षक ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे.

कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन

केवळ गैरवर्तनच नाही, तर या विकृत शिक्षकाने या चिमुकल्यांना ‘हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन’ अशी धमकीही दिली होती. मात्र, पीडित मुलींनी धाडस दाखवून हा प्रकार पालकांना सांगितला आणि या नराधमाचे पितळ उघडे पडले. या घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली.

या घटनेमुळे शिक्षकी पेशावर प्रश्नचिन्ह

शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना घडत असल्याने शिक्षकी पेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर शिक्षण विभागातही खळबळ उडाली असून संबंधित शाळेच्या प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण मागवण्यात येत आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे. मात्र, या घटनेने शाळा सुरक्षित आहेत का? हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.

पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून आम्ही आरोपी शिक्षक महादेव मानतोडे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 , 75, 78, 352 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती डोणगाव पोलीसांनी दिली आहे.

ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रवृत्तीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्राची प्रतिमा डागाळली जाते. आम्ही प्रशासकीय पातळीवर योग्य ती माहिती वरिष्ठांना दिली असून पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याची माहिती शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक देविदास अंभोरे यांनी दिली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts