Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

UPSC Prelims 2026 निकालाची प्रतीक्षा संपणार? 15 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता

UPSC Prelims 2026

UPSC Prelims 2026 Result: UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ च्या निकालाची लाखो उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत. अयोग लवकरच निकाल जाहीर करण्याची शक्यता असून, यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्रता मिळणार आहे.

संघ लोकसेवा अयोग (UPSC) लवकरच नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर करू शकतो. देशभरातील लाखो उमेदवार निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अयोग १५ जूनपर्यंत अधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे.

निकाल पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिला जाईल. त्यामध्ये यशस्वी उमेदवारांचे रोल नंबर आणि अर्ज क्रमांक नमूद असतील. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार पुढील टप्पा म्हणजेच मुख्य परीक्षा (mains) देण्यासाठी पात्र ठरतील.

उमेदवारांनी निकाल आणि पुढील प्रक्रियेशी संबंधित सर्व अद्ययावत माहितीसाठी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: SpaceX लिस्ट होताच पैशांचा पाऊस? पहिल्याच दिवशी शेअरने गुंतवणूकदारांना दिला मोठा नफा!

२४ मे रोजी झाली होती परीक्षा

नागरी सेवा पूर्व परीक्षा २४ मे रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने OMR शीटच्या माध्यमातून दोन सत्रांमध्ये पार पडली. पहिल्या सत्रात सामान्य अध्ययन (GS) पेपर घेण्यात आला , तर दुसऱ्या सत्रात CSAT परीक्षा झाली.

लाखो उमेदवारांचा सहभाग

यावर्षी UPSC ने सुमारे ९३३ पदांसाठी अर्ज मागवले होते. परीक्षेसाठी सुमारे ८.१ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. देशातील ८३ शहरांमधील २,०७२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार, सुमारे ५.४ लाख उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले असून उपस्थितीचे प्रमाण जवळपास ६७ % होते.

निकाल कसा तपासावे?

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथे “UPSC CSE Prelims 2026 Result” या लिंकवर क्लिक करून पीडीएफ फाइल उघडावी. त्यानंतर रोल नंबर किंवा अर्ज क्रमांक शोधून निकाल तपासता येईल. भविष्यातील संदर्भासाठी पीडीएफ डाउनलोड करून जतन करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यशस्वी उमेदवारांना भरावा लागेल DAF

पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी Detailed Application Form (DAF) भरावा लागेल. यासंदर्भातील वेळापत्रक आणि आवश्यक सूचना आयोग लवकरच जाहीर करणार आहे.

उत्तरपत्रिका जाहीर करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल

यंदा UPSC ने परीक्षेनंतर अवघ्या चार दिवसांत, म्हणजे २८ मे रोजी, तात्पुरती उत्तरपत्रिका (Provisional Answer Key) प्रसिद्ध करून नवा पायंडा पाडला. यापूर्वी सामान्यतः संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जात असे. यावेळी जारी करण्यात आलेल्या उत्तरपत्रिकेत १०० प्रश्नपैकी एक प्रश्न वगळण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts