गणेशोत्सवाच्या काळात
भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर
माता गौरी घरोघरी विराजमान होतात.
असं मानलं जातं कि,
माता पार्वतीच गौरीचे रूप धारण करून
आपल्या बाळाला – गणपती बाप्पांना
भेटायला माहेरी येतात…
ती २ दिवस माहेरी येते, पाहुणचार स्वीकारते,
आणि मग परत सासरी जाते…
गौरीच्या दुसऱ्या दिवशी जेष्ठ गौरींचे आगमन होते
जेष्ठ नक्षत्रांवर त्यांचे आगमन होत असल्याने
त्यांना जेष्ठ गौरी हे नाव पडलेय.
प्रत्येक भागात गौरी पूजनाची पद्धत , कुळाचार,
वेगवेगळी असते…
तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते.
महाराष्ट्रातील प्रत्येक भागात
गौरी आणि गणपतीचे नाते वेगवेगळे आहे,
काही ठिकाणी ती आई तर काही ठिकाणी बहिण मानली जाते.
म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते अशी श्रद्धा आहे..
महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या,
फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते…
गौरी आवाहनाच्या दिवशी गौरीना घरी आणले जाते…
गौरी आवाहनाच्या दिवशी,
लक्ष्मीच्या पावलांचे ठसे घरभर उमटवले जातात…
जे देवीच्या आगमनाचे शुभचिन्ह मानले जाते…
त्यानंतर त्यांना स्थानापन्न केलं जातं..
दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन पारंपारिक पद्धतीने केले जाते…
यादिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते…
यामध्ये १६ भाज्या, खीर, गोडाचे पदार्थ, लाडू,
चकल्या, करंजी, विविध प्रकारची फळे यांचा समावेश असतो…
याच दिवशी काही ठिकाणी ववसा देण्याची प्रथा असते.
स्त्रिया देवीच्या कृपेसाठी संकल्प करून विशिष्ठ नवस पूर्ण करतात
गौरी हि माहेरवाशीण लेक मानली जाते…
ती माहेरी तीन दिवस वास्तव्य करते…
या काळात तिचे स्वागत, पूजन, पाहुणचार प्रेमाने केला जातो..
गौरी गणपती हा फक्त सण नाही तर
हा श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्त्री शक्तीच्या सन्मानाचा उत्सव आहे…
पुढील भागात पाहूया
अमावस्या पौर्णिमेचे रहस्य, गणपती बाप्पांनी दिला शाप












