July 2026 Ekadashi: हिंदू धर्मात एकादशीचे व्रत भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. यंदा जुलै महिन्यात दोन महत्त्वाच्या एकादशी येत असून, चला तर जाणून घेऊया त्यांच्या तिथी आणि पूजेची वेळ.
हिंदू धर्मात एकादशीचे व्रत भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि त्या दिवशी उपवास, जप, दान व पूजन करण्याची परंपरा आहे. जुलै 2026 मध्ये योगिनी एकादशी आणि देवशयनी एकादशी या दोन महत्त्वाच्या एकादशी येत असून, दोन्ही दिवसांना धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. जाणून घ्या या व्रतांच्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पारणाची वेळ.
हेही वाचा: जुलै 2026 मध्ये आहेत हे महत्त्वाचे सण आणि व्रत; जाणून घ्या संपूर्ण महिन्याचे कॅलेंडर
योगिनी एकादशी –10 जुलै 2026
आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी 10 जुलै रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि पुण्याची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
तिथी
प्रारंभ : 10 जुलै 2026, सकाळी 8:16
समाप्त : 11 जुलै 2026, पहाटे 5:22
पूजेचा शुभ मुहूर्त
ब्रह्ममुहूर्त : पहाटे 4:41 ते 5:24
अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:17 ते 1:10
देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) – 25 जुलै 2026
आषाढ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी येत आहे. या दिवसापासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक मान्यता आहे. याच दिवसापासून चातुर्मासालाही प्रारंभ होतो. त्यामुळे या एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
तिथी
प्रारंभ : 24 जुलै 2026, सकाळी 9:12
समाप्त : 25 जुलै 2026, सकाळी 11:34
पूजेचा शुभ मुहूर्त
ब्रह्ममुहूर्त : पहाटे 4:45 ते 5:29
अभिजीत मुहूर्त : दुपारी 12:19 ते 1:11
का मानले जाते विशेष?
योगिनी एकादशीला पापक्षालन आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते, तर देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होत असल्याने धार्मिक विधी, जप, दान आणि साधनेला अधिक महत्त्व प्राप्त होते. या दोन्ही एकादशींना श्रद्धेने उपवास आणि विष्णूपूजन केल्यास सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.





