Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला; बॉम्बस्फोटांनी हादरली राजधानी कराकस
ताज्या बातम्या

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला; बॉम्बस्फोटांनी हादरली राजधानी कराकस

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला; बॉम्बस्फोटांनी हादरली राजधानी कराकस

America Attack Venezuela : अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमधील एका प्रमुख लष्करी तळाला लक्ष्य केलं आहे. कराकसमधील नौदल तळावर झालेल्या हल्ल्यात पेंटागॉनचा सहभाग असल्याचं वृत्त आहे. शनिवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास राजधानीत किमान सात शक्तिशाली स्फोट ऐकू आले. शहराच्या अनेक भागातून धुराचे लोट उठताना दिसले.

लोक घराबाहेर धावले :

शनिवारी रात्री कराकसमध्ये सीएनएनच्या एका टीमने अनेक स्फोट पाहिले. पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार पहाटे 1:50 वाजता झाला. सीएनएनचे प्रतिनिधी ओसमारी हर्नांडेझ यांनी वृत्त दिलं की एक स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यानं त्याच्या खिडकीच्या काचा हलवल्या. स्फोटांनंतर कराकसच्या अनेक भागात वीज गेली आणि अनेक विमानं आकाशातून उडताना दिसली. या घटनेवर व्हेनेझुएलाच्या (America Attack Venezuela) सरकारकडून तात्काळ कोणतंही अधिकृत विधान आलं नाही. स्फोट ऐकताच, शहरातील अनेक भागातील लोक घराबाहेर आणि रस्त्यावर धावले. कराकसच्या विविध भागात लोक दिसले.

अमेरिकेसोबत दीर्घकाळापासून सुरु आहे तणाव :

अलीकडच्या काळात अमेरिकन सैन्य ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींना लक्ष्य करत असताना हा हल्ला झाला आहे. शुक्रवारी व्हेनेझुएलानं सांगितलं की ते ड्रग्ज तस्करी थांबवण्यासाठी अमेरिकेशी करार करण्यास तयार आहेत. अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी आरोप केला आहे की अमेरिका त्यांचे सरकार बदलू इच्छिते आणि व्हेनेझुएलाच्या विशाल तेल साठ्यात प्रवेश मिळवू इच्छिते. त्यांच्या मते, ऑगस्टमध्ये कॅरिबियन समुद्रात मोठ्या प्रमाणात लष्करी तैनातीसह दबाव मोहीम सुरु करण्यात आली होती.

ट्रम्प यांनी यापूर्वी दिला होता इशारा :

या हल्ल्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला वारंवार इशारा दिला होता. त्यांनी सांगितलं की अमेरिका व्हेनेझुएलातील कथित ड्रग्ज तस्करी नेटवर्कविरुद्ध नवीन कारवाईची तयारी करत आहे. ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांनी असा दावाही केला होता की त्यांनी सीआयएला व्हेनेझुएलाच्या आत काम करण्यास अधिकृत केलं आहे जेणेकरुन तेथून बेकायदेशीर ड्रग्ज तस्करी आणि स्थलांतरितांची हालचाल रोखता येईल.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts