खाटीक समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती पोलिसांनी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी जालना पोलिसांकडे वर्ग केला आहे. खाटीक संघटनेच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली.












