Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शेतकऱ्यांचा खात्यावर जात पैसे नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही; बच्चू कडू
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा खात्यावर जात पैसे नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही; बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या सहकार्याने आजचं यश मिळालं आहे. शेतकर्‍यांचा एकजुटीमुळे तारखेपासून पळ काढणाऱ्याला सरकारला जागेवर आणलं. सरकारने कठीण काळात मार्ग काढला, त्यामुळे त्यांचं पण अभिनंदन. आंदोलन न करणारे आता कमेंट्स करत असतील. पण छाताडावर गोळ्या लागल्याशिवाय कळत नाही. सरकारचा पैसा शेतकऱ्यांचा खात्यावर जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिल आहे. सरकारने काही दगाफटका केल्यास बच्चू कडू फासावर जायला तयार आहे पण मागे हटणार नाही. सरकारकडून जर काही काटकारस्थान झाल्यास त्यांना देखील सोडणार नाही. कर्जमाफी झाल्याशिवाय सरकारला आम्ही शांद बसू देणार नसल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी माध्यमांसमोर दिली आहे.

कटकारस्थान केल्यास कोणालाही सोडणार नाही

सरकारने वेळेत मार्ग काढला असता तर अशी वेळ आली नसती. आश्वासन दिल्यावरही सरकारने कटकारस्थान केल्यास कोणालाही सोडणार नाही. गुरुवारी रात्री बैठक झाल्यावर अनेक जण प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत. मात्र, शेंगदाण्याची चव माहित नसणाऱ्यांनी काजूवर बोलू नये, असा इशाराही कडू यांनी दिला.

अजित दादांनी सांगितले आर्थिक परिस्थिती बिकटच

आर्थिक परिस्थिती विघट आहे माहिती आहे. बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्ही दरोडा टाका पण पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे, असेही बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा – Namo Tourism Center : गडकिल्ल्यांवर नमो टूरिझम सेंटर उभारूनच दाखवा, उभ केलं की फोडणार; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

३० जून २०२६ पूर्वी संपूर्ण शेतकर्‍यांची कर्जमाफी

३० जून २०२६ पूर्वी राज्यातील संपूर्ण शेतकर्‍यांची कर्जमाफी केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूं यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळाला दिली आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना याबाबची माहिती दिली आहे. त्यामुळे बच्चू कडू आणि त्यांच्यासोबतच्या इतर शेतकरी नेत्यांसाठी हे मोठं यश मानलं जात आहे.

“बच्चू कडू यांचं समाधान झालं आहे. आम्ही आमच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत घोषणा दिली होती. त्या संदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती तयार करुन कर्जमाफी कशी करायची, दिर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कारण कर्जमाफी हा एक भाग आहे. पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो, त्यांना आपण यातून बाहेर कसं काढू शकतो याचा विचार व्हावा अशाप्रकारची अपेक्षा आहे, बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलं आहे.

कर्जमाफीसाठी समिती स्थापना

शेतकऱ्यांना कायमचे कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सूचविण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपल्या अहवाल सादर करीन. त्यानंतर सरकारकडून त्यांच्या शिफारशींचा अभ्यास करून ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.

सरकारने पूर्णतः गंडवण्याचा विडा उचलला आहे

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने पूर्णतः गंडवण्याचा विडा उचलला आहे की काय? हेच कळत नाही. कर्जमाफीसंदर्भात अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना शोधण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. आता ही समिती अभ्यास करून सहा महिन्यांनी सरकारला शिफारशी करेल मग सरकार निर्णय घेईल. सरकारने कर्जामाफीची शिफारस करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा GR म्हणजे सरकारने वेळ मारून नेण्यासाठी केलेली उपाययोजना असल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

दोन महिन्यापूर्वी बच्चू कडू यांचं उपोषण सोडवतानाही सरकारने समिती स्थापन केली होती दोन महिने झाले समितीची एक तरी बैठक झाली का? मुळात कर्जमाफी करायला समितीची गरजच काय? त्यामुळं सरकारने अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणं बंद करून तत्काळ सरसकट कर्जमाफी घोषित करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts