Rajyasabha Election 2026 | येत्या 16 मार्च रोजी महाराष्ट्रात राज्यसभेच्या (Maharashtra Rajyasabha Election 2026) 7 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात सर्व पक्षांना वेध लागले आहेत ते राज्यसभा निवडणुकांचे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान भाजपामध्ये उमेदवारीवरून नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यसभेसाठी भाजपाने (BJP) नवी रणनीती आखली असून, नव्या चेहऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – अजितदादांच्या निधनानंतर राजकारणात खळबळ! तीन नेत्यांचे राजीनामे; तटकरेंविरोधात नाराजी?
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या नव्या रणनीतीनुसार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून जुन्या चेहऱ्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपा आपल्याकडे असलेल्या जागांसाठी चार नवीन उमेदवार देऊ शकतो. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde), आदिवासी महिला नेत्या मायाताई इवनाते Mayatai Ivnate) आणि माजी खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde) यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, जुन्या नेत्यांची विकेट पडणार असल्याचं दिसत आहे. यामध्ये धैर्यशील पाटील (Dhairyshil Patil), रामदास आठवले (Ramdas Athwale) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये देखील राज्यसभेच्या एका जागेवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यसभेसाठी आपला उमेदवार जावा म्हणून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. या जागेसाठी ठाकरे गटातील काही नेते इच्छुक असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शरद पवारांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.












