Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजित पवारांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले, तो डॅमेज झाला नाही…
ताज्या बातम्या

अजित पवारांच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले, तो डॅमेज झाला नाही…

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash | अजित पवारांच्या अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये VSR कंपनीचे मालक रोहित सिंह (Rohit Singh) हे स्वत: पायलट सीटवर बसून विमान सुरू असताना झोपलेले दिसत होते. या व्हिडीओवरून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. तर आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर करत संशय व्यक्त केले आहेत.

हेही वाचा – भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर, विनोद तावडे, आठवलेंसह आणखी दोघांना संधी

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी म्हटलं की, जेव्हा दुबईत तेजस विमान कोसळलं होतं त्यामध्ये आपला पायलट शहीद झाला होता. पण त्यावेळी त्या विमानातील ब्लॅक बॉक्स (Black Box) सापडला होता आणि त्यातील डेटा घेतला आहे. त्यानंतर अहमदाबादमध्ये झालेला विमानाचा स्फोट मोठा होता. त्यातीलही ब्लॅक बॉक्स सापडला होता आणि डेटाही निघाला होता. मात्र, डीजीसीएने (DGCA) तो पूर्णपणे दिला नव्हता. नंतर यूएसमध्ये लेअरजेट पडलं होतं, त्याचाही ब्लॅक बॉक्स सापडला होता. त्यातीलही सर्व माहिती घेण्यात आली होती.

ब्लॅक बॉक्सबाबत रोहित पावरांनी काय दावा केला?

अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. त्या बॉक्सवर रामचंद्र नावाचे डिरेक्टर आहेज जे 2023 ला असिस्टंट डायरेक्टर होते त्यांनी सही केली आहे. ते तो ब्लॅक बॉक्स ओके आहे असं म्हणाले आहेत. त्या ब्लॅक बॉक्सवर फक्त राख बसली आहे. ते डॅमेज झालेलं नाही. राख बसली म्हणून ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला असं जर म्हणत असतील तर ही गोष्ट हास्यास्पद आहे, असं रोहित पवार म्हणाले.

ब्लॅक बॉक्सच्या आत एक चीप असते. तो फोटो रिपोर्टमध्ये यायला हवा होता मात्र दुर्दैवानं तो आला नाही. तसेच अजितदादांच्या विमानातील सापडलेला ब्लॅक बॉक्स डॅमेज झालेला नाही, असा दावा राहित पवार यांनी केला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts