Karjat: राजकीय मैदानात एकमेकांविरोधात लढणारे रोहित पवार आणि राम शिंदे आता एकाच फ्रेममध्ये दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या एकत्र येण्यामागचे नेमके कारण काय? जाणून घ्या सविस्तर.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत (Karjat) नगरपरिषेदच्या राजकारणात महत्त्वाची घडामोडी घडली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपच्या छायाताई शेलार यांच्या बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने कर्जतच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे विधान परिषेदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या विकासाच्या मुद्द्यावर समन्वय झाल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळाले. त्यामुळे कर्जत (Karjat) नगरपरिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) यांच्यातील सहकार्याची चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा: नाशिकमध्ये राजकीय खळबळ! ठाकरे गटातील नगरसेवकांबाबत मोठी चर्चा; पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं?
छायाताई शेलार यांची बिनविरोध निवड (Chhayatai Shelar)
नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या छायाताई शेलार (Chhayatai Shelar) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. भाजपच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) NCP Sharad Pawar च्या चार नगरसेवकांनीही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. या निर्णयामुळे नगरपरिषदेत सत्तेचे नवे समीकरण निर्माण झाले आहे.
विकासासाठी एकत्र आल्याची चर्चा
गेल्या काही महिन्यांपासून कर्जत शहरातील अनेक विकासकामे रखडल्याची भावना नागरिकांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर विकासाला प्राधान्य देण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्याची भूमिका स्वीकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नगरपरिषदेतील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा विश्वास
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर छायाताई शेलार यांनी सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहराच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि रखडलेल्या विकासकामांना वेग देण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विकासालाच प्राधान्य
माजी नगराध्यक्ष नामदेव (देवा) राऊत यांनीही विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी सहकार्यकरण्याची भूमिका स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Karjat
जिल्हाभर चर्चेचा विषय
कर्जत नगरपरिषदेतील (Karjat Nagar Parishad) या नव्या राजकीय घडामोडीची अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले हे नवे समीकरण भविष्यातील स्थानिक राजकारणावर काय परिणाम करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे









