बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील राजुरी परिसरात टेम्पो पलटी झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविताना विट वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे, या भीषण अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले असल्याचे समोर येत आहे. यावेळी टेम्पो पलटी झाल्यानंतर चालक अडकला होता. त्याला जेसीबीच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. राजुरी परिसरात रस्त्यावरच अनेक खड्डे पडल्याने असे अनेक अपघात पाहायला मिळतात. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी सातत्याने जोर धरत आहे.












