Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • भारतात लवकरच लॉन्च होणार नवीन इलेक्ट्रिक SUV; ‘Thar’ ला मिळणार थेट टक्कर
Top News

भारतात लवकरच लॉन्च होणार नवीन इलेक्ट्रिक SUV; ‘Thar’ ला मिळणार थेट टक्कर

Chery iCar V23

Chery iCar V23 electric SUV India launch: आजकाल इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहनप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच भारतात Chery iCar V23 ही इलेक्ट्रिक SUV लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे मॉडेल थार देखील थेट टक्कर देण्याची शक्यता आहे.

आजकाल भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे आणि जेएसडब्ल्यू मोटर्स (JSW Motors) या क्षेत्रात मोठी एंट्री करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी बाजारात अनेक नवीन गाड्या लॉन्च करत आहे, त्यापैकी चेरी आयकर व्ही २३ (Chery iCar V23) सर्वात लोकप्रिय आहे. ही एक इलेक्ट्रिक SUV असेल जी भविष्यात महिंद्रा थार (Mahindra Thar) च्या इलेक्ट्रिक व्हर्जनला थेट टक्कर देऊ शकते.

हेही वाचा: तयारीला लागा! २१ जूनला होणार TET परीक्षा; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

असे मानले जाते की, आयकार व्ही२३ (iCar V23) भारतात थार ईव्ही (Thar EV) सोबतच लॉन्च केली जाऊ शकते. ही एसयूव्ही खास अशा ग्राहकांसाठी डिझाइन केली आहे, ज्यांना साहसी आणि इलेक्ट्रिक ड्रायव्हिंगचा अनुभव घ्यायचा आहे. केवळ जेएसडब्ल्यूच भारतात स्वतःच्या ब्रँड नावाने ही कार लॉन्च करू शकते, त्यामुळे त्यात काही बदल दिसू शकतात.

डिझाइन आणि लूक

Chery iCar V23 चे डिझाइन MIni G- wagon सारखे बॉक्सी आणि दमदार आहे. आकाराने कॉम्पॅक्ट पण उंच असलेली ही SUV ऑफ- रोडिंगसाठी योग्य आहे. गोल हेडलाइट्स, मोठे टायर आणि मजबूत बॉडी या कारला प्रचंड उपस्थिती देतात. चार्जिंग केबलसाठी स्वतंत्र जागा आणि प्रॅक्टिकल स्टोरेजची सोय देखील आहे.

बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स

ही पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असून यात सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर अशा दोन्ही पर्यायांची सुविधा आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार परफॉर्मन्स निवडता येईल. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार सुमारे ५०० किमीची रेंज देते. इलेक्ट्रिक असल्यामुळे ती पर्यावरणपूरक असून चालवण्याचा खर्च कमी आहे.

इंटीरियर आणि फीचर्स

Chery iCar V23 चे इंटीरियर स्टायलिश आणि मॉडर्न आहे. प्रवाशांसाठी पुरेशी जागा, आरामदायी सीटिंग आणि प्रगत टेक फीचर्स आहेत. युवा ग्राहक आणि अॅडव्हेंचर प्रेमींना लक्षात ठेवून ही SUV तयार केली गेली आहे, ज्यामध्ये आराम आणि टेक्नॉलॉजीचा उत्तम संगम आहे.

किंमत आणि लॉन्च

Chery iCar V23 भारतात सुमारे 15 ते 25 लाख रुपयांच्या किमतीत येण्याची शक्यता आहे. ही किंमत SUV सेगमेंटमध्ये मोठी टक्कर देऊ शकते. ही SUV 2027 पर्यंत भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts