• Home
  • राजकारण
  • राजकारणात खळबळ! नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Top News

राजकारणात खळबळ! नरहरी झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

zirwal

Narhari Zirwal | राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे काही दिवसांपूर्वीच मंत्रालयातील लाच प्रकरणामुळे अडचणीत आले होते. तर आताही पुन्हा एकदा नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नुकताच झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे नरहरी झिरवाळ यांचं टेन्शन वाढणार आहे. तर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – ईदच्या सुट्ट्यांनंतर घरी परतताना काळाचा घाला! प्रवासी बस पद्मा नदीत कोसळली; 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नरहरी झिरवाळ यांचा नेमका कोणता व्हिडीओ व्हायरल झालाय?

बुधवारी (25 मार्च) नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कथित व्हिडीओत नरहरी झिरवाळ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती एका खोलीत बिछान्यावर पडलेली दिसत आहे. त्या व्यक्तीसोबत आणखी एक कर्मचारी देखील दिसत आहे. हा कर्मचारी खाली बसलेला दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय घडलं?

बिछान्यावर झोपलेल्या नरहरी झिरवाळ यांच्यासोबत त्यांच्या शेजारी एका ट्रान्सजेंडर व्यक्ती देखील दिसत आहे. तसेच त्यांच्या रूमध्ये काही पदार्थ आणि मद्याची बाटलीही दिसत आहे. तर या व्हिडीओत नरहरी झिरवाळ हे अर्धनग्न अवस्थेत बिछान्यावर झोपलेले दिसत आहेत आणि त्यांच्या शेजारी ट्रान्सजेंडर व्यक्ती झोपलेली दिसत आहे. हा आक्षेपार्ह व्हिडीओ शासकीय विश्रामगृहातील असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कथित आक्षेपार्ह व्हिडीओत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत ट्रान्सवूमन होती. या ट्रान्सवूमनचं नाव पवन यादव असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे ट्रान्सवूमन पवन यादवचा भाऊ रवी यादवने हा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे हे प्रकरण समोर आले आहे.

रवी यादवने हा व्हिडीओ शेअर करत काही आरोप देखील केले आहेत. पवन यादव हा ट्रान्सवूमन आहे आणि तो खंडणी गोळा करण्याचं काम करतो. तसेच खंडणीप्रकरणी आणि दमदाटी केल्याप्रकरणी मुंबईतील पोलीस स्थानकात त्याच्यावर याआधीच गुन्हा दाखल केला आहे, असे आरोप रवी यादवने केले आहेत.

दरम्यान, नरहरी झिरवाळ यांचा हा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. तसेच राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे. असंही म्हटलं जात आहे की, बुधवारी व्हायरल झालेला हा व्हिडीओ सात महिन्यापूर्वीचा आहे. तर या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. पण, या व्हिडीओनंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts