उमरखेड तालुक्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीच्या संकटामुळे हवालदिल झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या मदतीबाबत तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक वाघमारे यांची बेजबाबदार समोर आला आहे. ढाणकी येथील शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण फुलकुंटवार यांचे नाव अतिवृष्टी अनुदान यादीतून वगळले गेले याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकऱ्याचा मुलगा कार्यालयात गेला असता त्याला अपमान जनक वागणूक तलाठी भोजने यांनी दिली. त्या तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे मात्र या संदर्भात कृषी अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता कृषी अधिकाऱ्याने कॅमेरासमोर बोलण्यास नाकार दिले.












