Blind Women’s T20 World Cup : ब्लाइंड महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय ब्लाइंड महिला क्रिकेट संघानं नेपाळचा 7 विकेट्सनं पराभव करुन विजेतेपद पटकावलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेपाळचा संघ फक्त 114 धावांवर कोसळला. प्रत्युत्तरात भारतानं 12 षटकांत सहज लक्ष्य गाठलं. हा पहिलाच ब्लाइंड महिला टी-20 विश्वचषक होता आणि भारतानं पदार्पणातच ट्रॉफी जिंकली.
भारताकडून फुला सरीनची दमदार खेळी
दीपिका (6 धावा) आणि अनेखा देवी (2 धावा) यांनी भारतीय महिला संघाकडून डावाची सुरुवात केली. मात्र, दोन्ही खेळाडू मोठी धावसंख्या उभारु शकल्या नाहीत. त्यानंतर फुला सरीन आणि करुणा के. यांनी दमदार फलंदाजी केली. फुला सरीननं नाबाद 44 धावा काढत भारताकडून सर्वाधिक धावा काढल्या, तर करुणानं 27 चेंडूत एकूण 42 धावा काढल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला कोणतीही अडचण आली नाही आणि तो आरामात धावा काढू शकला नाही. नेपाळचा कोणताही गोलंदाज प्रभाव पाडू शकला नाही.
हेही वाचा – स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका! लग्न सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला..
नेपाळला फक्त 114 धावांवर रोखलं
सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजीमध्ये भारतानं नेपाळला पाच बाद 114 धावांवर रोखलं. नेपाळच्या खेळाडूंना सामन्यात धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारताचं वर्चस्व इतकं मजबूत होतं की नेपाळनं त्यांच्या डावात फक्त एकच चौकार मारला. नेपाळनं उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 7 विकेट्सनं पराभव केला. भारतानं उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनं पराभव केला.
India creates history! 🇮🇳
Our women’s blind cricket team defeats Nepal to win the Women’s Blind World Cup title! 🏆
A proud moment celebrating courage, talent and determination. Congratulations, Team India! 🇮🇳💙 @narendramodi @BCCI #INDvsNEP #Final #BlindCricket #TeamIndia pic.twitter.com/riVQZqqxLH
— Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) November 23, 2025
पाकिस्तानची मेहरीन चमकली
सह-यजमान श्रीलंकेनं पहिल्या फेरीत पाच सामन्यांमध्ये फक्त एकच सामना (अमेरिकेविरुद्ध) जिंकला. पाकिस्तानची बी3 (अंशतः ब्लाइंड) खेळाडू मेहरीन अली सहा संघांच्या स्पर्धेत सर्वात यशस्वी फलंदाज होती. तिनं श्रीलंकेविरुद्ध 78 चेंडूत 230 धावांसह 600 पेक्षा जास्त धावा केल्या. तिनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 133 धावाही केल्या होत्या.












