Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

भारत टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर? काय आहेत शक्यता वाचा सविस्तर… 

India out of T20 World Cup

India out of T20 World Cup : सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेटमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सावाचे वातावरण आहे. यंदाची ट्रॉफी भारताने जिंकावी अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. भारतीयांची इच्छा असली तरीही प्रत्यक्षात परिस्थिती फार चिंताजनक आहे. भारताचा नुकताच दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभव झाला. त्यानंतर आता भारत या विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर फेकला जाणार का? भारतीयांच्या ट्रॉफीचे स्वप्न अधुरेच राहणार का? असे अनेक प्रश्न भारतीय क्रिकेटप्रेमींना पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विश्वचषकात भारतीय संघ कुठे आहे? अन् भारतीयांचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न कसे भंग होऊ शकते याची सविस्तर माहिती घेऊया..

भारताचा सेमी फायलनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कठीण

सर्वप्रथम भारत अजूनही टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर पडलेला नाही. परंतु भारताचा सेमी फायलनपर्यंत पोहोचण्याचा रस्ता मात्र फारच कठीण झाला आहे. वेस्ट इंडीजमुळे भारताची डोकेखी वाढली आहे. सुपर-8 सामन्यांत भारताने पहिला सामना 76 धावांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेविरोधातील या पराभवामुळे भारताचे रनरेट-3.800 वर पोहोचले आहे. आपल्या ग्रुपमध्ये टीम इंडिया ही तिसऱ्या स्थानी आहे. भारताच्या वर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन देश आहे. या दोन्ही देशांचे रनटेट अनुक्रमे +5.350 आणि +3.800 आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर टीम इंडियाला या दोन्ही संघांना रन रेटच्या बाबतीत मागे टाकावे लागेल.

नेमक्या काय शक्यता आहेत ते पाहू..

भारत आणि झिम्बॉव्वे हे दोन्ही देश आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झाले. तर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही देश आपल्या पहिल्या सामन्यात विजयी झाले. भारताला सेमी फायनलमध्ये जायचे असेल तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांनी आपापले दोन्ही सामने गमवायला हवेत. वेस्ट इंडीजचा भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात दोन सामने होणार आहेत. तर दक्षिण आफ्रिका हा देश वेस्ट इंडीज आणि झिम्बॉम्बे या दोन संघांशी भिडणार आहे.

“…तर भारत सेमी फायनलमध्ये जाऊ शकतो”

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने गमावल्यास भारत सेमी फायनलमध्ये जाऊ शकतो. वेस्ट इंडीज आपल्या दोन्ही सामन्यांत पराभूत होऊ शकतो. परंतु दक्षिण आफ्रिकेविरोधात असा दावा करणे थोडे कठीण आहे. असे झाल्यास भारताला सेमी फायनलमध्ये स्थान मिळणे थोडे कठीण ठरू शकते. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts