Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विश्वविजेत्या वेस्ट इंडिजसमोर झिम्बाब्वेची शरणागती; 107 धावांनी कॅरोबियन संघाचा दणदणीत विजय
Top News

विश्वविजेत्या वेस्ट इंडिजसमोर झिम्बाब्वेची शरणागती; 107 धावांनी कॅरोबियन संघाचा दणदणीत विजय

West Indies Beats Zimbabwe

West Indies Beats Zimbabwe : 2026 च्या टी-20 विश्वचषकातील 44व्या सामन्यात वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेचा दारुण पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं 107 धावांनी विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 6 गडी गमावून 254 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे फलंदाज अपयशी ठरले आणि 17.4 षटकांत 147 धावांवर सर्वबाद झाले. यामुळं या विश्वचषकातील झिम्बाब्वेची विजयी मालिका खंडित झाली आणि त्यांचा पहिला पराभव झाला.

हेटमायर आणि पॉवेलची स्फोटक खेळी :

या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. शिमरॉन हेटमायर आणि रोवमन पॉवेल यांच्या स्फोटक खेळीमुळं वेस्ट इंडिजनं निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 254 धावांचा डोंगर उभारला. ही धावसंख्या 2026 च्या टी-20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. ब्रँडन किंग फक्त 12 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. त्यानंतर, हेटमायर आणि पॉवेल यांनी 52 चेंडूत तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. हेटमायरनं 34 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांसह 85 धावा केल्या. या डावात त्याचा स्ट्राईक रेट 250 होता. रोव्हमन पॉवेलनंही 35 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 59 धावा केल्या. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून शेरफेन रुदरफोर्डनंही धमाकेदार खेळी केली, त्यानं 13 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. रोमारियो शेफर्डनं 10 चेंडूत 21 धावा केल्या.

झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्सची धमाकेदार खेळी :

वेस्ट इंडिजनं दिलेल्या 255 धावांच्या प्रत्युत्तरात झिम्बाब्वेची सुरुवातच खराब झाली. 20 धावसंख्येवर संघाच्या सलग तीन विकेट पडल्या. प्रथम,तादिवानाशे मारुमानी 14 धावांवर बाद झाला, त्यानंतर ब्रायन बेनेट 5 धावांवर आणि रायन बर्ल 0 धावांवर बाद झाला. त्यांच्या बाद झाल्यानंतर, डायन मेयर्स देखील 28 धावांवर बाद झाला. टोनी मुनयोंगा आणि सिकंदर रझा यांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. मात्र 94 धावांवर पाचवी विकेट पडल्यानंतर झिम्बाब्वेचा डाव पुन्हा एकदा डबघाईला आला. मेयर्स व्यतिरिक्त, सिकंदर रझानं 27 धावा केल्या. ब्रॅड इव्हान्सनं 21 चेंडूत 43 धावा करत पराभवाचं अंतर काहीसं कमी करण्याचा प्रयत्न केला. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत गुडाकेश मोतीनं सर्वाधिक 4 बळी घेतले. तर अकील हुसेननं 3 बळी घेतले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts