The mayor is at your door : उल्हासनगर (Ulhasnagar Municipal Corporation) शहरात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर अश्विनी निकम (Mayor Ashwini Nikam) यांनी ‘महापौर आपल्या दारी’ (The mayor is at your door Activities) हा उपक्रम सुरू करत थेट नागरिकांपर्यंत जाण्याचा निर्णय (Decision to reach out to citizens) घेतला आहे. उल्हासनगरमध्ये दूषित पाणी आणि अनियमित (Contaminated water and irregularities) पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक प्रभागांत महिने-महिने पाणीपुरवठा बंद असल्याची तक्रार आहे. पाणी गळतीमुळे मोठ्या प्रमाणात नासाडी (Water wastage due to leakage) होत असून आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यानंतर महापौर निकम यांनी हा मोठा निर्णय उल्हासनगरकरांसाठी घेण्यात आलाय.
हेही वाचा – सभागृहातील दादांची रिकामी खुर्ची पाहून, आदिती तटकरे ढसाढसा रडल्या…
या पार्श्वभूमीवर महापौर अश्विनी निकम यांनी नगरसेवकांसह तातडीची बैठक घेतली. बैठकीत प्रशासनावर जोरदार टीका करत तात्काळ उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. याचवेळी ‘महापौर आपल्या दारी’ या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत महापौर स्वतः विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेणार असून संबंधित विभागांना तत्काळ कारवाईचे आदेश देणार आहेत.
‘जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणे ही आमची जबाबदारी आहे,’ असे स्पष्ट करत महापौरांनी थेट संवादातून प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीप्रश्नावरून वाढलेल्या नाराजीनंतर आता या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












