Sanjay Raut’s big claim : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे फायरब्रांड नेते आणि खासदार यांनी आज पुन्हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाही. कारण भाजप तसे होऊ देणार नाही. त्यांना भाजपमध्ये जावे लागेल, तिथे काही दिवस राहावे लागेल, तेव्हा कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतात, त्याशिवाय ते कधीच शक्य नसल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजप हा आमचा सहकारी पक्ष होता. त्यांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केलंय. तेव्हा त्यांनी शिवसेना फोडायची होती म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं.
हेही वाचा – संतप्त उल्हासनगरकरांसाठी महापौरांचा मोठा निर्णय; “महापौर आपल्या दारी”ची घोषणा!
सुप्रीम कोर्टातील न्यायाधिश हे भाजपाचे कार्यकर्ते
पुढे बोलताना राऊत म्हणाले, सुप्रीम कोर्ट हा भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे. सुप्रीम कोर्टातील बरेच न्यायाधिश हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, ते त्या पद्धतीने काम करतात. तुम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करता. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या सुप्रीम कोर्टाला मुर्ख म्हटलं, ज्यावेळी त्यांनी टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यावेळी ट्रंपने त्यांच्या कोर्टाच्या न्यायाधिशाला मुर्ख म्हटले. डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या कोर्टाला मुर्ख म्हटले… का मुर्ख म्हटले… ते सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे, इतकेच मी सांगेन.
भाजपाकडे कोणता विचारच नाही – राऊत
लोकशाहीमध्ये आमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलाय. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थोडीजरी लोकशाहीचे काही असेल तर त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे. पुण्याच्या हणमंत पवार मारहाण प्रकरणात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केले. विचारांची लढाई आपण विचारांनी करायचे बोलतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडेही विचार असावा लागतो ना? भाजपाकडे कोणता विचारच नाही. हिंदू-मुसलमान यापेक्षा कोणता विचार आहे का त्यांच्याकडे? कोणताच विचार त्यांच्याकडे नाही. राजकीय विचार नाही, सामाजिक विचार नाही, सांस्कृतिक विचार नाही, सामाजिक विचार नाही… विचार असेल तर आम्ही विचारांची लढाई करू असेही राऊतांनी म्हटले.
जीव नकोसा करायचा हे अजित पवारांच्या बाबतीत झाले
जिव नकोसा होईल आणि तो इतका नकोसा करायचा की, तो आपला पक्ष सोडून तुमच्या पक्षात जाईल, इथंपर्यंत जीव नकोसा करायचा. हे अजित पवारांच्या बाबतीत झाले आहे आणि हे आम्ही डोळ्यांनी बघितले. अजित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे काय मनापासून भारतीय जनता पक्षाचा जवळ गेले नाहीत. हे आपली कातडी वाचायला आणि संपत्ती वाचवण्याकरिता गेले, असेही राऊतांनी म्हटले.












