Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाकरी फिरवली! भाजपकडून नवीन कार्यकारणीची घोषणा, नव्या आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी..
Top News

भाकरी फिरवली! भाजपकडून नवीन कार्यकारणीची घोषणा, नव्या आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी..

BJP new executive committee

BJP new executive committee : राज्यातील लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता भाजपने पक्षातील जबाबदाऱ्यांसाठी भाकरी फिरवली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची आज अधिकृत घोषणा केली. या नवीन निवडींमध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना बढती देण्यात आली आहे. तर काही नवीन आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणारे केशव उपाध्ये यांची आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ता म्हणून वर्णी लागली आहे.

हेही वाचा – सभागृहातील दादांची रिकामी खुर्ची पाहून, आदिती तटकरे ढसाढसा रडल्या…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. ही कार्यकारिणी निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे आधीच ठरले होते. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम असून, ज्यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. त्यांना आगामी काळात संघटनेच्या इतर कामात सामावून घेतले जाईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

12 जणांची उपाध्यक्षपदी निवड

भाजपने एकूण १२ जणांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यात प्रामुख्याने माजी खासदार आणि आमदारांचा समावेश आहे. यात अतुल काळसेकर, डॉ. भारती पवार, संजय कौडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर या १२ जणांच्या नावावर उपाध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

6 सरचिटणीसांची घोषणा

तर दुसरीकडे संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ६ सरचिटणीसांची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आमदार निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे आणि योगेश सागर यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लागली आहे. तर मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांसारख्या युवा आणि आक्रमक चेहऱ्यांना चिटणीस पदावर संधी देण्यात आली आहे.

विविध आघाड्यांचे प्रमुख

युवा मोर्चा : कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.
महिला मोर्चा : आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे महिला मोर्चाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे.
ओबीसी मोर्चा : योगेश टिळेकर यांची ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली आहे.
कोषाध्यक्ष : मुंबईचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडे पक्षाच्या तिजोरीची किल्ली सोपवण्यात आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts