Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Shorts

लॉकडाऊनच्या अफवेवर केंद्र सरकार काय म्हणाले? मोठी अपडेट

lock down

lockdown : देशात कोरोनासारखा पुन्हा एकदा लॉकडाऊन (lockdown) लावण्यात येईल, अशा प्रकारची अफवा पसरली होती. मात्र या अफवेवर उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, लॉकडाऊन लावण्याचा असा कोणताही प्लान नाही. देशात लॉकडाऊन लागणार नाही. त्यामुळे देशातील नागरिकांना पुरता दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा: श्रीलंकन नौदलाकडून भारतीय सात मच्छीमारांना अटक

इंधन टंचाईचा सामना

आखाती देशातील युद्धामुळे अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक देशात मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यातच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना कोरोनाचा उल्लेख केला. त्यामुळे देशात लॉकडाऊन लागते की काय अशी शंका लोकांच्या मनामध्ये येऊ लागली.

लॉकडाऊन लावण्यात येणार नाही

देशभरात पसरलेल्या लॉकडाऊनच्या अफवेने आता केंद्र सरकारने मोठी अपडेट दिली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Petroleum Minister Hardeep Singh Puri) म्हणाले, या अफवांवर विश्वास ठेऊ नका, देशात कुठल्याही प्रकारे लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे सांगितले. हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील यासंदर्भात भलीमोठी पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्टपणे सांगतो की सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. अशावेळी आपण शांत, जबाबदार आणि एकजूट राहण्याची खूप गरज आहे.’

भारत आव्हानांना सामोरे जाणार

आखाती देशातील युद्धामुळे अनेक देशात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. परंतु संभाव्य इंधन टंचाईवर भारत मात करू शकतो. तशी भारताने उपाय योजना आखल्या आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुठल्याही समस्या आल्या तरी त्या सोडवल्या जातील. आव्हानांना सामोरे जाण्यास आपण सक्षम आहोत, असे हरदीप सिंग पुरी म्हणाले.

Summary

लॉकडाऊनबाबतच्या अफवा खोट्या आहेत.

केंद्र सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण.

नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts