• Home
  • देश
  • काय….भारत थांबवू शकते युद्ध; जागतिक नेत्यांचे कोणते आहे आकलन ?
Top News

काय….भारत थांबवू शकते युद्ध; जागतिक नेत्यांचे कोणते आहे आकलन ?

america-iran war

iran-america-israiel war : इराण-इस्राईल (ian-ieraiel-america war) आणि अमेरिका या देशातील युद्ध थांबायला हवे, अशी जगाची अपेक्षा आहे. परंतु त्याला अद्याप यश आलेले नाही. मात्र भारत युद्ध थांबवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असे मोठे विधान दिल्लीतील इस्त्रायलचे राजदूत रुवेन अझर (Israeli Ambassador Reuven Azar) यांनी केले. रुवेन अझर यांनी म्हटले की, पश्चिम आशियामध्ये भारताचे महत्त्वपूर्ण हितसंबंध आहेत. या युद्धात मध्यस्थ म्हणून पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्तच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.

हे ही वाचा: भारतीय वायू सेनेचे ‘कॅपिटल बजेट’…! काय आहे मेगा प्लॅन

युद्ध टोकाला पोहचले

इराण-इस्राईल आणि अमेरिका हे युद्ध टोकाला पोहचले आहे. त्यामुळे अनेक देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्धामुळे अनेक देशाना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहेत. दरम्यान, पाच दिवसांसाठी अमेरिकेकडून युद्धबंदी जाहीर करण्यात आली. अनेक देश युद्ध बंदीसाठी पुढे येताना दिसत आहेत. कारण युद्ध लांबले तर जगभरात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. या युद्धाचा परिणाम अनेक देशांना भोगावा लागू शकतो. हे लक्षात घेऊन अनेक देशानी आता युद्ध बंदीसाठी पुढाकार घेतला आहे.

आमच्या अटी स्वीकारा : इराण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने आम्हाला प्रस्ताव दिला आहे. हे युद्ध थांबवायचे असेल तर आमच्या अटी स्वीकारल्या पाहिजेत, जोपर्यंत अटी स्वीकारल्या जाणार नाहीत तोपर्यंत युद्ध थांबणार नाही अशी भूमिका इराण सरकारने घेतली आहे.

केंद्राची करडी नजर

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारची यावर करडी नजर आहे. इराण व इस्राईल या दोन्ही देशांशी भारत सरकारचे घनिष्ठ संबंध आहेत. परंतु होर्मुज खाडी (Gulf of Hormuz) बंद असल्याने भारतात त्याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. भारतात एलपीजी गॅसचा (lpg ) तुटवडा आहे, तर कच्च्या तेलाचीही समस्या उदभवली आहे. तेलाच्या किमती वाढल्याने मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, होर्मुज खाडीत भारताचे 20 जहाजा अडकून पडली आहेत. युद्धादरम्यान इराणकडून भारताचे जहाज सोडले गेले. भारतात एलपीजी गॅसचा पुरवठा होर्मुज खाडीच्या माध्यमातूनच होतो.

भारताच्या भूमिकेचे स्वागत

रुवेन अझर म्हणाले, आपण राजनयिकरणाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आम्ही भारताच्या भूमिकेचे स्वागत करतो. कारण यादरम्यान भारताची भूमिका अनुकूल आहे. पश्चिम आशिया भारताचे संबंध चांगले आहेत आणि तिथे अनेक भारतीय राहतात. भारत एक आर्थिक महासत्ता आहे. पश्चिम आशियामध्ये अनेक सहकार्य प्रकल्प देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts