Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले, पुरावे नष्ट करण्यासाठी…
Top News

अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले, पुरावे नष्ट करण्यासाठी…

wadettiwar 1
100

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदू ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. तर पोलिसांनी केलेल्या तपासात अशोक खरातच्या फार्महाऊसवर एक पेनड्राईव्ह सापडला आहे ज्यात 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. यापार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा केला आहे.

हेही वाचा – अजित पवारांच्या घराबाहेर खरातने केली काळी जादू? रोहित पवारांनी व्यक्त केला संशय, म्हणाले, दादांची ताकद जावी म्हणून…

अशोक खरातबाबत विजय वडेट्टीवारांनी नेमका काय दावा केला?

अशोक खरात प्रकरणातील सर्व धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अशोक खरात प्रकरणावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, अशोक खरातचा लॅपटॉप आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं असल्याचं सांगितलं जात आहे. मग त्यातील सापडलेला पेन ड्राईव्ह समोर का आणला जात नाही? जर तो पेन ड्राईव्ह समोर आणला तर मंत्रिमंडळातील दोन-तीन मंत्र्यांची विकेट पडू शकते, असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला आहे.

राज्य सरकार या प्रकरणातील माहिती अर्धीच सांगत आहे आणि अर्धी लपवत आहे. मुख्यमंत्री आपल्या लोकांना आणि मित्रपक्षांना वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. तसेच एसआयटीच्या तपासात सत्य बाहेर येईल यावर आमचा विश्वास नाहीये, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी एसआयटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विजय वडेट्टीवारांनी रूपाली चाकणकरांवर साधला निशाणा

पुढे विजय वडेट्टीवारांनी रूपाली चाकणकरांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, रूपाली चाकणकर या अजूनही अनेक पदांवर कार्यरत आहेत. जोपर्यंत सुनील तटकरे ठरवत नाहीत तोपर्यंत चाकणकरांवर पूर्ण कारवाई होणार नाही. तटकरे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सध्या राष्ट्रावादीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे दोनच बॉस आहेत, त्यामुळे ते दोघंच या प्रकरणाचा निकाल लावतील, असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला.

अशोक खरात प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, अशी शक्यता विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts