• Home
  • राजकारण
  • पार्थ पवारांकडून तटकरेंचा गेम? प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला राष्ट्रवादीत कल्ला
Top News

पार्थ पवारांकडून तटकरेंचा गेम? प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला राष्ट्रवादीत कल्ला

Sunil Tatkare

Sunil Tatkare : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची तब्बल 6 तास बैठक झाल्याची माहिती आहे…या बैठकीत पक्षाबाबतच्या अनेक विषयांवर चर्चा झाली..यावेळी राज्यात जर पक्ष वाढवायचे असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला असा सल्ला प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांना दिल्याची चर्चा आहे…त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार का? सुनील तटकरेंच्या जागी आता राष्ट्रवादीला नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार का? असा प्रश्न निर्माण झालाय…सुनील तटकरे आणि खासदार पार्थ पवार यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती..तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती…यामुळे पार्थ पवार आणि तटकरे-पटेल यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची देखील माहिती समोर आली होती..आता काहीच दिवसानंतरच सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची चर्चा सुरू झाली आहे…त्यामुळे सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीत गेम कोण करतंय? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलले जणार आहेत का? प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून पार्थ पवार प्रदेशाध्यक्ष बदलत आहेत का? या सर्व चर्चांवर सुनील तटकरेंनी काय म्हटलंय

सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात 6 तास बैठक ( Sunetra Pawar )

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) आणि राष्ट्रीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात मुंबईतील ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी तब्बल सहा तास बैठक झाल्याची सुत्रांची माहिती आहे… या गुप्त बैठकीत प्रशांत किशोर यांनी थेट सुनील तटकरेंच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, जर पक्षात सुधारणा करून संघटना मजबूत करायची असेल, तर तातडीने प्रदेशाध्यक्ष बदला, असा सल्ला सुनेत्रा पवारांना दिल्याची माहिती आहेत…अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर पकड मिळवण्यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून धडपड सुरू असल्याची चर्चा आहे….यातच प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून सुनील तटकरेंचा ‘गेम’ करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे…

या बैठकीमुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार का आणि सुनील तटकरेंच्या जागी राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झालाय… वास्तविक पाहता, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत पातळीवर मोठे वाद सुरू असल्याची माहिती समोर येत होती… ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघे मिळून अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्याचा आणि स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती… या सर्व हालचालींमुळे खासदार पार्थ पवार आणि तटकरे-पटेल गटामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते… वडिलांचा राजकीय वारसा आणि पक्षावरील पवारांचे नियंत्रण अबाधित ठेवण्यासाठी पार्थ पवार आणि जय पवार गेल्या काही दिवसांपासून सक्रीय पाहायला मिळत आहे…

अशातच, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अचानक सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची चर्चा सुरू झाल्याने, सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीत गेम नेमका कोण करतंय, असा प्रश्न निर्माण झालाय…राजकीय विश्लेषकांच्या मते, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पक्षात वाढते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी पवार कुटुंबाने, विशेषतः खासदार पार्थ पवार यांनी हा मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळला आहे, अशी चर्चा आहे… खासदार पार्थ पवार हे स्वतः प्रशांत किशोर यांना दिल्लीहून विशेष विमानाने मुंबईत घेऊन आले होते, अशी माहिती आहे… प्रशांत किशोर यांच्यासारख्या देशातील सर्वात मोठ्या रणनीतीकाराला पक्षात आणून, त्यांच्या ‘सर्व्हे रिपोर्ट’च्या आधारे सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची कायदेशीर आणि तांत्रिक खेळी पार्थ पवार खेळत असल्याची जोरदार चर्चा आहे… जर रणनीतीकारानेच “तटकरे पदावर राहिले तर पक्ष आगामी निवडणुकीत जिंकणार नाही” असा अहवाल दिला, तर सुनेत्रा पवार तटकरेंना पदावरून हटवून दुसरे प्रदेशाध्यक्ष निवडतील, अशी चर्चा सुरू आहे….. प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून पार्थ पवार हेच पक्षात मोठे फेरबदल करत असल्याची चर्चा आहे..पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही…

हेही वाचा : पवारांचे खासदार मोदींना भेटणार? मंत्रिमंडळ विस्ताराआधी भेट दिल्लीत नेमकं घडतंय काय?

प्रशांत किशोरांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा ( Prashant Kishor )

सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर वक्तव्य केलं.. जोपर्यंत राज्यातील मुख्य नेतृत्व म्हणजेच प्रदेशाध्यक्ष रणनीतीनुसार पूर्ण सहकार्य करत नाही, तोपर्यंत ग्राऊंड लेव्हलवर काम करणे कठीण आहे, असं प्रशांत किशोर यांनी म्हटल्याची माहिती आहे….जर भविष्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत रणनीतीकार म्हणून काम करावे असे वाटत असेल, तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत आधी कठोर निर्णय घ्यावा लागेल, असंही त्यांनी म्हटल्याची माहिती आहे…

या सर्व चर्चांवर खासदार सुनील तटकरेंनी माध्यमासमोर येत आता प्रतक्रिया दिली आहे…प्रशांत किशोर यांची नेमणूक झाली असती तर मला माहिती असतं…पक्षात आम्ही नेहमी एकत्र बसून चर्चा करत असतो..सर्व नियुक्त्या माझ्या सह्यांच्या पत्राच्या आधारेच होतात..प्रशांत किशोर राजकीय रणनीतीकार म्हणून नेमले नाहीत…नेमणुकीची माहिती मला असती…प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांची भेट औपचारिक होती, एवढंच मला माहिती आहे…मला सर्वेची किंवा रणनीतीकारची गरज नाही, असं सुनील तटकरे म्हणाले…

सुनील तटकरेंनी बैठकीबाबत काय सांगितले? ( Sunil Tatkare )

आता सर्वत्र चर्चा सुरू आहे की प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिला आहे…मात्र सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय की त्यांना प्रशांत किशोर राजकीय रणनीतीकार म्हणून नेमल्याची माहिती नाही…त्यामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षालाच इतक्या मोठ्या 6 तासांच्या बैठकीची थोडीही कल्पना नसणे, यावरून पक्षात पडद्यामागे सर्व काही आलबेल नाही आणि तटकरेंना जाणीवपूर्वक बाजूला ठेवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे…तुम्हाला काय वाटतं हळूहळू सुनील तटकरेंचा राष्ट्रवादीत गेम होत आहे का? राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची खेळी कोण करतंय?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts