Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुकिंग नियम बदलले, आता सिलिंडरसाठी इतके दिवस वाट पाहावी लागणार
Top News

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुकिंग नियम बदलले, आता सिलिंडरसाठी इतके दिवस वाट पाहावी लागणार

LPG Gas Booking New Rule | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध (War) चांगलेच पेटले आहे. या तिन्ही देशांमधील युद्ध थांबण्याचे नावच घेत नाहीये. त्यामुळे या युद्धाचा फटका अनेक देशांना बसताना दिसत आहे. यामध्ये भारताला देखील या युद्धाचा जोरदार फटका बसला आहे. आता भारतात या युद्धाचा परिणाम जाणवू लागला आहे. कारण मध्यपूर्वेतील या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील गॅस सिलिडरच्या बुकिंग नियमांमध्ये (LPG Gas Booking New Rule) मोठा बदल झाला आहे.

हेही वाचा – अजित पवारांच्या अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; व्ही के सिंगने CID ला सांगितले खरे सत्य, म्हणाला, “त्या चुकीमुळे…”

मध्यपूर्वेती युद्धामुळे भारतातील एलपीजी सिलिंडर गॅसचे दर 50 ते 60 रूपयांनी वाढले आहेत. अशातच आता गॅस सिलिंडर रीफील करण्याचे नियमही बदलण्यात आले आहेत. सरकारनं युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल केले आहेत.

गॅस सिलिंडरच्या बुकींग नियमांमध्ये काय बदल झाले?

याआधी एलपीडी गॅस सिलिंडर बूक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागत होती. पंधरा दिवसांनंतर दुसरा सिलिडंर बूक करता येत होता. पण, आता नव्या नियमावलीनुसार हा वेटिंग टाईम वाढवण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार आता पहिला सिलिंडर बूक केल्यानंतर दुसरा सिलिंडर बूक करण्यासाठी पंधरा दिवसांऐवजी आता 21 दिवस वाट पहावी लागणार आहे. 21 दिवसांनंतर तुम्हाला दुसरा सिलिंडर बूक करता येणार आहे.

नव्या नियमांनुसार आता पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर हा 21 दिवसांनंतर मिळणार आहे. हे नवीन नियम कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केले आहेत. तसेच एलपीजी गॅस एजन्सीला तेल कंपन्यांनी गॅस बुकींग केल्यानंतर 24 तासांच्या आत सिलिंडर देणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, युद्धाचा महाराष्ट्रातील पुण्यात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा व्यवस्थेवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता पुण्यात व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे. पुण्यातील घरगुती ग्राहकांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्यामुळे या निर्णयाचा परिणाम पुण्यातील व्यावसायिकांवर होणार आहे. कारण पुण्यामध्ये हॉटेल, स्वीट होम्स, रेस्टॉरंट, मेस आणि केटरिंग सेवा अशा अनेक व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. आणि आता अचानक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद केल्यामुळे व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ होणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts