Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • कोकणात शिमगोत्सव! संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगणारे क्षण, देवीला निरोप देताना भाविक झाले भावूक
ताज्या बातम्या

कोकणात शिमगोत्सव! संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगणारे क्षण, देवीला निरोप देताना भाविक झाले भावूक

Shimgotsav in Konkan

Shimgotsav in Konkan : कोकणातील पारंपारिक शिमगोत्सवाची सांगता आता होतेय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात ग्रामदैवत श्रीदेवी पाथरजाई देवीच्या पालखीचा सीमा सोडण्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. या सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते. देवीला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत भावुकता पाहायला मिळाली.

संपूर्ण कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असताना खेड शहरातील ग्रामदैवत श्रीदेवी पाथरजाई देवीच्या पालखीची सीमा सोडण्याची परंपरा मोठ्या भक्तिभावात पार पडली. रात्रीच्या सुमारास देवीची पालखी देवळातून निघाली आणि शहरातील हजारो भाविक या पारंपारिक सोहळ्याला उपस्थित राहिले.देवीची मनोभावे पूजा करून भक्तांनी देवीला निरोप दिला. वर्षभर आपल्या भक्तांची काळजी घेणारी देवी पुन्हा मंदिरात परतते, तो क्षण प्रत्येक भाविकासाठी अत्यंत भावूक करणारा असतो.

वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा पिढीही मोठ्या उत्साहाने पुढे

या परंपरेत स्थानिक मानकरी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. परंपरा आणि श्रद्धेचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा पिढीही मोठ्या उत्साहाने पुढे येत असल्याचे मानकऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी देवीच्या पालखीला मानाचा नारळ अर्पण

3 या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खेड पोलीस स्टेशनकडून दिला जाणारा मानाचा नारळ. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांनी देवीच्या पालखीला मानाचा नारळ अर्पण केला. इतकंच नाही तर पोलिसांनी स्वतः पालखी खांद्यावर घेऊन नाचवत उत्सवाचा आनंदही लुटला.

देवीसमोर प्रार्थना करत पुढील वर्षी पुन्हा याच भक्तिभावात भेटण्याची इच्छा

देवीला निरोप देताना भाविकांच्या मनात भावनांचा उहापोह दिसून आला. अनेक भाविकांनी देवीसमोर प्रार्थना करत पुढील वर्षी पुन्हा याच भक्तिभावात भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts