Blood Sugar Control: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर होताना दिसत आहे. अनेकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नकळत वाढत असून ही चिंतेची बाब ठरत आहे. मात्र योग्य आहार, नियमित सवयी आणि काही नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास ब्लड शुगर सहज नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. अनियमित आहार, कमी शारीरिक हालचाल आणि वाढत ताण यामुळे अनेकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नकळत वाढत आहे. सुरुवातीला लक्षणे स्पष्ट दिसत नसल्याचे ही समस्या दुर्लक्षित राहते, मात्र पुढे जाऊन ती गंभीर स्वरूप धारण करू शकते.
हेही वाचा: मोठा निर्णय! उष्णतेमुळे शाळांच्या वेळेत बदल; वाचा प्रशासनाचे नवे आदेश
अशा परिस्थितीत साखर पूर्णपणे टाळण्यापेक्षा तिचे योग्य नियोजन करणे अधिक महत्त्वाचे ठरते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि काही प्रभावी नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे शक्य होते. यातील सर्वात रामबाण उपाय म्हणजे शेवग्याची पाने. ही पाने पोषक घटकांनी भरलेली असून शरीरासाठी अत्यंत लाभदायक मानली जातात. विशेषतः ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.
शेवग्याच्या पानांचा वापर कसा करावा?
शेवग्याची ताजी पाने स्वच्छ धुवून सावलीत किंवा उन्हात वाळवून घ्या आणि त्याची बारीक पावडर तयार करा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा ही पावडर मिसळून पिण्याची सवय लावा. नियमित सेवन केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो.
काय आहेत फायदे?
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित तक्रारी कमी होण्यास मदत होते. तसेच हे नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास सहाय्यक ठरते.
याशिवाय, या पानांच्या सेवनामुळे मेटाबॉलिझम सुधारतो, वजन कमी करण्यास मदत होते आणि शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासही मदत मिळते. हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही हे उपयुक्त मानले जाते.
तुम्हाला पाण्याऐवजी वेगळा पर्याय हवा असेल, तर शेवग्याची भाजी करूनही तिचे सेवन करता येते.










