Late-Night Habits Affect Heart Health: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनियमित दिनचर्या, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाढता मानसिक ताण याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, विशेषतः संध्याकाळी ७ नंतर काही चुकीच्या सवयी कायम ठेवल्यास हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.
शरीराचे नैसर्गिक जैविक चक्र म्हणजे सर्केडियन रिदम संध्याकाळीनंतर शरीराला विश्रांतीसाठी तयार करू लागते. या काळात मेटाबॉलिझम मंदावतो आणि शरीराची ऊर्जा कमी होऊ लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळेत घेतलेल्या चुकीच्या सवयी आरोग्यास गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. चला तर जाणून घेऊयात कोणत्या सवयी आहेत.
आणखी वाचा: ‘या’ महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत ३००० रुपये; एप्रिलचा हप्ता का अडकला? जाणून घ्या
रात्री जास्त प्रमाणात जेवण करणे
जर तुम्ही ७ नंतर किंवा उशिरा अतिप्रमाणात जेवण केल्यास पचनक्रियेवर ताण येतो. तेलकट आणि मसालेदार पदार्थांमुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते, ज्याचा परिमाण हृदयावर होऊ शकतो.
संध्याकाळी जास्त कॉफी पिणे
कॉफीमधील कॅफिन शरीराला सतर्क ठेवते. मात्र रात्रीच्या वेळी जास्त कॅफिन घेतल्यास झोपेवर परिणाम होतो. अपुरी झोप ही हृदयविकारासाठी मोठे कारण मानली जाते.
रात्री उशिरा स्नॅक्स खाणे
चिप्स, गोड पदार्थ किंवा प्रोसेस्ड फूड रात्री खाल्यास रक्तातील साखर आणि फॅट्स वाढू शकतात. यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिमाण होतो.
रात्री उशिरापर्यंत काम करणे
रात्री उशिरा लॅपटॉपवर काम करत राहणे, ऑफिसचा ताण किंवा वैयक्तिक चिंता रात्रीपर्यंत मनात ठेवणेधोकादायक ठरू शकते. सतत ताणाखाली राहिल्यास रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त दबाव येतो.
उशिरापर्यंत जागरण
मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉपमुळे अनेक जण रात्री उशिरापर्यंत जागतात. अपुरी झोप आणि बिघडलेली स्लीप सायकल हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.
आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
संध्याकाळीनंतर हलका आहार, वेळेवर झोप आणि ताणमुक्त जीवनशैली अंगीकारल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.
टीप : ही माहिती सामान्य आरोग्य जागरूकतेच्या उद्देशाने देण्यात आली आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.












