Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचे आहे? मग फक्त मीठ नव्हे, तर ‘ही’ सवय बदला
लाईफस्टाईल

बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचे आहे? मग फक्त मीठ नव्हे, तर ‘ही’ सवय बदला

BIpi

Blood Pressure Control Tips: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हायपरटेन्शनची (बीपी) समस्या वाढताना दिसत आहे. डॉक्टर वारंवार मिठाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात, मात्र केवळ मीठ कमी करणे पुरेसे नाही. काही महत्त्वाच्या सवयी बदलल्यास रक्तदाबावर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवता येते. नेमक्या कोणत्या सवयी यासाठी उपयोगी ठरतात, ते जाणून घेऊया.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत बीपी ( Blood Pressure) ही एक सामान्य पण गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे. वाढता ताण, अनियमित दिनचर्या, झोपेची कमतरता आणि चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे ही समस्या तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. अनेकदा डॉक्टर आहारात मीठ कमी करण्याचा सक्का देतात, मात्र केवळ हा एकच बदल पुरेसा ठरत नाही. रक्तदाबावर खरा आणि दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्यासाठी जीवनशैलीतील काही मूलभूत सवयी बदलणे अत्यंत गरजेचे ठरते. नेमक्या कोणत्या सवयी यासाठी उपयुक्त ठरतात, ते पाहूया.

हेही वाचा: NEET पेपर कसा अन् कुठून लीक झाला? जाणून घ्या A टू Z संपूर्ण माहिती

जीवनशैली आणि बीपीचा संबंध

अनियमित दिनचर्या, कमी शाररिक हालचाल, वाढत ताण आणि चुकीचाआहार यांचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. त्यामुळे हायपरटेन्शन हा केवळ आहाराचा नाही, तर संपूर्ण जीवनशैलीशी संबंधित आजार मानला जातो.

मीठ कमी करणे पुरेसे का नाही?

मीठ कमी केल्याने काही प्रमाणात फायदा होतो, पण जर इतर सवयी बदलल्या नाहीत तर रक्तदाब पूर्णपणे नियंत्रणात येत नाही. अनेकदा ताणतणाव. झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव हे अधिक मोठे कारण ठरतात.

रक्तदाब नियंत्रणासाठी महत्वाच्या सवयी

१) नियमित व्यायाम

दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योग किंवा हलका व्यायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.

२) ताणतणाव कमी करणे

अतिताणामुळे शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडते. ध्यान, श्वसन व्यायाम आणि पुरेशी विश्रांती यामुळे ताण कमी होतो.

३) पुरेशी झोप

दररोज ६ ते ८ तास शांत झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपुरी झोप रक्तदाब वाढवू शकते.

४) संतुलित आहार

फळे, भाज्या आणि फायबरयुक्त अन्नाचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे.

५) कॅफिन आणि साखरेचे प्रमाण कमी करणे

अत्याधिक चहा, कॉफी आणि गोड पदार्थांचे सेवनही रक्तदाबावर परिणाम करू शकते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts