Digital Detox Tips: मोबाईल आणि सोशल मीडियाशिवाय काही मिनिटेही राहणे कठीण वाटत असेल, तर डिजिटल डिटॉक्सच्या या सवयी अवलंबा. मानसिक शांतता आणि चांगले आरोग्य मिळवण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. कसे तर जाणून घ्या.
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, दिवसभर मोबाईलवर वेळ घालवणे, प्रत्येक नोटिफिकेशनला प्रतिसाद देणे आणि सतत सोशल मीडिया स्क्रोलची सवय मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते. अशा वेळी ‘डिजिटल डिटॉक्स’ हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.
हेही वाचा: ‘अतिरेक करणाऱ्यांवर कारवाई करा’; आंदोलकांवरील पोलिस कारवाईवर सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा
डिजिटल डिटॉक्स म्हणजे नेमके काय?
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळासाठी मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर मर्यादित करणे. याचा उद्देश तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर जाणे नसून त्याचा अधिक संतुलित आणि गरजेनुसार वापरकरण्याची सवय लावणे हा आहे.
दिवसाची सुरूवात मोबाईलऐवजी स्वतःसाठी करा
अनेकजण सकाळी उठताच मोबाईल हातात घेतात. त्याऐवजी काही मिनिटे स्ट्रेचिंग, प्राणायाम, ध्यान किंवा सकाळच्या फेरफटका मारण्याचा प्रयत्न करा. यामुळे दिवसाची सुरुवात अधिक उत्साही आणि सकारात्मक होते.
सोशल मीडियासाठी वेळेची मर्यादा ठेवा
दिवसभर वारंवार सोशल मीडिया पाहण्यापेक्षा ठराविक वेळ निश्चित करा. उदाहरणार्थ, सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक १५ ते २० मिनिटे सोशल मीडिया वापरण्याची सवय लावा. यामुळे वेळेचे नियोजन चांगले होते.
अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा
सर्व अॅप्सची नोटिफिकेशन्स सुरू ठेवण्याची गरज नसते. महत्वाच्या अॅप्स वगळता इतर सोशल मीडिया अॅप्सची सूचना बंद ठेवल्यास सतत फोन तपासण्याची सवय कमी होऊ शकते.
हेही वाचा: MHT-CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा दावा? छत्रपती संभाजीनगरमधील कथित ऑडिओ क्लिपने खळबळ
जेवताना आणि कामाच्या वेळी फोन दूर ठेवा
जेवताना, अभ्यास करताना किंवा कार्यालयीन काम करताना मोबाईल बाजूला ठेवा. अशा छोट्या बदलांमुळे एकाग्रता वाढते आणि काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येते.
झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून अंतर ठेवा
झोपण्याच्या किमान ३० ते ४० मिनिटे आधी मोबाईल किंवा टॅबलेटचा वापर टाळा. त्याऐवजी पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका किंवा कुटुंबीयांशी संवाद साधा. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
सोशल मीडिया फीड स्वच्छ ठेवा
जे अकाउंट्स किंवा पेज केवळ नकारात्मकता पसरवतात किंवा वेळ वाया घालवतात, त्यांना अनफॉलो किंवा म्यूट करा. प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कंटेंटला प्राधान्य द्या.
Screen Time फीचरचा वापर करा
बहुतेक स्मार्टफोनमध्ये Screen Time किंवा digital wellbeing सारखी सुविधा उपलब्ध असते. या फिचरच्या मदतीने कोणत्या अॅपवर किती वेळ खर्च होतो. हे समजू शकते आणि आवश्यक असल्यास वापराची मर्यादा निश्चित करता येते.
आठवड्यात एक दिवस ‘नो सोशल मीडिया डे’
आठवड्यातील एखादा दिवस किंवा काही तास सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचा प्रयत्न करा. हा छोटासा बदल मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
डिजिटल डिटॉक्चे फायदे
डिजिटल डिटॉक्सचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास अनेक सकारात्मक बदल जाणवू शकतात.
मानसिक ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
झोप अधिक शांत आणि दर्जेदार होते.
काम आणि अभ्यासातील एकाग्रता वाढते.
स्क्रिन टाइमवर नियंत्रण मिळते.
कुटूंब आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवता येतो.
मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते.
डिजिटल साधनांचा वापर टाळणे हा उपाय नाही, तर त्यांचा योग्य आणि मर्यादित वापर करणे हीच डिजिटल डिटॉक्सची खरी संकल्पना आहे. छोट्या सवयी बदलल्यास मोठा सकारात्मक परिणाम अनुभवता येऊ शकतो.








