Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • रासायनिक पद्धतीने पिकवलेलं कलिंगड ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स
ताज्या बातम्या

रासायनिक पद्धतीने पिकवलेलं कलिंगड ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स

Chemically Ripened Watermelon Tips

Chemically Ripened Watermelon Tips : एका रात्रीत हसतं-खेळतं कुटुंब संपलं. निमित्त ठरलं कलिंगड खाण्याचं, पण मृत्यूचं कारण मात्र आता वेगळ्याच दिशेला वळताना दिसत आहे. मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता ‘वेदनाशामक’ पदार्थांचा शिरकाव झाल्याने हे प्रकरण अन्नातून विषबाधा की आणखी काही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

25 एप्रिलची ती रात्र डोकाडिया कुटुंबासाठी अखेरची ठरली. अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांच्या कुटुंबाने रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्ले. त्यानंतर अवघ्या काही तासांतच कुटुंबातील चौघांनाही उलट्या, तीव्र पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. २६ एप्रिलला प्रकृती इतकी खालावली की दोन्ही मुली बेशुद्ध पडल्या. जेजे रुग्णालयात दाखल करेपर्यंत एका मुलीचा श्वास थांबला होता, तर काही तासांच्या अंतराने दुसरी मुलगी आणि आई-वडिलांचाही मृत्यू झाला.

सुरुवातीला हे प्रकरण केवळ अन्नातून विषबाधा असल्याचे वाटत होते. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या शरीराच्या तपासणीत पेनकिलर-सदृश वेदनाशामकासारखा पदार्थ आढळल्याची शक्यता आहे. जर हा पदार्थ शरीरात गेला असेल, तर तो कलिंगडातून आला की आणखी कशातून? याचा तपास आता पोलीस आणि डॉक्टरांची टीम करत आहे. जरी रुग्णालय प्रशासनाने अधिकृत पुष्टी केली नसली, तरी या संशयाने तपासाची सुई फिरली आहे.

घातक रसायने जीवघेणी ठरू शकतात

फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी घातक रसायने जीवघेणी ठरू शकतात. कलिंगड लाल दिसावे म्हणून त्यात रंग इंजेक्शनद्वारे टोचले जातात. कलिंगडाचा एक तुकडा पाण्यात टाका; जर पाणी रंगीत झाले, तर समजा त्यात भेसळ आहे. कलिंगड कापण्यापूर्वी ते बाहेरून स्वच्छ धुवा. तसेच ज्या सुरीने कापणार आहात, ती सुरीही स्वच्छ असावी. कलिंगड कापल्यानंतर ते जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका. कापलेले कलिंगड एका दिवसात संपवणे हिताचे असते. चिकन शिजवल्यामुळे त्यातील जिवाणू मरतात, पण फळं आपण कच्ची खातो, त्यामुळे रसायनांचा थेट परिणाम शरीरावर होतो.

नैसर्गिक कलिंगडच्या तुलनेत गडद आणि चमकदार

इंजेक्शन दिलेले किंवा रासायनिक प्रक्रियेने पिकवलेले कलिंगड ओळखण्यासाठी, फळावर देठाजवळ इंजेक्शनचे बारीक छिद्र कधीकधी ओले, असामान्य गडद लाल रंगाचा गर, कापल्यावर आत मोठी पोकळी खड्डा असणे आणि कडांवरून पांढरं पाणी येणे या मुख्य खुणा आहेत. नैसर्गिक कलिंगडच्या तुलनेत हे जास्त गडद आणि चमकदार दिसते. जर कलिंगडाचा देठ कडक आणि ताजे असेल, पण शरीराचा भाग जास्त मऊ किंवा रबरसारखा वाटत असेल, तर त्यात केमिकल्स असू शकतात. कापल्यावर आतमध्ये मोठी भेग किंवा खड्डा असल्यास ते इंजेक्शनचे लक्षण असू शकते. जर गर अतिशय गडद लाल असेल पण बिया पांढऱ्याच असतील, तर ते इंजेक्शन दिलेले असू शकते.चव: चव नेहमीपेक्षा वेगळी किंवा औषधी लागल्यास ते खाऊ नका. कलिंगड कापण्यापूर्वी २-३ दिवस घरात ठेवा. जर त्यातून फेस किंवा पांढरं पाणी बाहेर येत असेल तर ते केमिकलने पिकवलेले आहे.

बाजारातून आणलेली फळे नीट तपासून आणि स्वच्छ धुवूनच खा

अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. डोकाडिया यांच्या घरातून केवळ कलिंगडच नाही, तर इतर वस्तूंचेही नमुने जप्त करण्यात आले आहेत. माठातील आणि फ्रिजमधील पाणी, कच्चे शिजवलेले चिकन आणि भात, खजूर आणि विविध मसाले घेण्यात आलेत. पायधुनी पोलिसांनी केवळ अन्नबाधेवर लक्ष केंद्रित न करता, इतर कोनांतूनही तपास सुरू केला आहे. मृतांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यातील कॉल रेकॉर्ड्स आणि संशयास्पद मेसेजची तपासणी सुरू आहे. एका कलिंगडाने चार जीव घेतले की यामागे काही मोठे षडयंत्र आहे? याचे उत्तर आता रासायनिक विश्लेषण आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, या घटनेने सर्वसामान्यांच्या मनात फळे आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत मोठी भीती निर्माण केली आहे. थोडक्यात काय तर तुम्ही मात्र बाजारातून आणलेली फळे नीट तपासून आणि स्वच्छ धुवूनच खा. आरोग्याशी तडजोड जीवावर बेतू शकते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts