Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • हिंदीचा पुळका आलेल्या सदावर्तेंचा, मनसेकडून शाई अन् सुपारी फेकून निषेध
Top News

हिंदीचा पुळका आलेल्या सदावर्तेंचा, मनसेकडून शाई अन् सुपारी फेकून निषेध

MNS Protest Against Sadavarte

MNS Protest Against Sadavarte : मराठी भाषा, महाराष्ट्राची अस्मिता आणि राजकारण. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. सध्या राज्यात मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. या वादाची तीव्रता प्रचंड वाढली आहे, नेमका हा वाद काय आहे? राज ठाकरे आणि सदावर्ते यांच्यात संघर्ष का सुरू झाला? आणि या घटनेचे राजकीय परिणाम काय असू शकतात? याविषयी या लेखातून आपण माहिती घेऊ…

मराठी शिकण्यासाठी हिंदी भाषा रिक्षा-टॅक्सी चालकांना राज्य सरकारने ऑगस्टपर्यंतची मोठी मुदतवाढ दिलीय. पण या वादापोटी मराठी पोरं अजूनही भांडतायत आणि स्वतःवर केसेस ओढवून घेतायत. रिक्षा – टॅक्सी चालकांना मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात वाद सुरू झाला. मुद्दा आणला शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी आणि त्याचं राजकीय भांडवल झालं.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य

राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मुद्द्यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाला. या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध करत तो अन्यायकारक असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली. या टीकेनंतर मनसे आक्रमक झाली असून ठिकठिकाणी सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मनसेनं अमराठी चालकांना दिलेल्या आवाहनानंतर पेटून उठलेल्या गुणरत्न सदावर्तेंना आता थंड करायचा जणू काही पण च मनसेनं घेतलेला दिसतोय.

मनसे कार्यकर्त्यांनी शाई आणि सुपारी फेकून जोरदार निषेध

आज जालना दौऱ्यावर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर मनसे कार्यकर्त्यांनी शाई आणि सुपारी फेकून जोरदार निषेध नोंदवला. जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात हा प्रकार घडला. सदावर्ते यांनी अलीकडे मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याच वक्तव्याच्या निषेधार्थ मनसे पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत त्यांच्या वाहनाला घेराव घातला. काही कार्यकर्त्यांनी वाहनावर शाई आणि सुपारी फेकली.

पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. हा वाद आगामी काळात आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. गुणरत्न सदावर्ते आणि मनसे यांच्यातील हा वाद पुढे कोणतं वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts