Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • एकनाथ शिंदे ॲक्शन मूडमध्ये! दोन मंत्र्यांची खुर्ची धोक्यात; लवकरच ‘नारळ’ देण्याची शक्यता
ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे ॲक्शन मूडमध्ये! दोन मंत्र्यांची खुर्ची धोक्यात; लवकरच ‘नारळ’ देण्याची शक्यता

eknath shinde

Eknath Shinde in Action Mode: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षातील काही नेत्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः दीपक केसरकर आणि आणखी दोन मंत्र्याच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण आणि त्यासंदर्भात झालेल्या घडामोडींमुळे केसरकर यांच्यावर टीका होत आहे. तसेच जिल्हास्तरावर पक्षाची घटती ताकद आणि अलीकडील निवडणुकांतील अपेक्षाभंगामुळेही शिंदे नाराज असल्याचे समजते.

जिल्हा परिषद निवडणुक २०२६

अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुक २०२६ निकालांमध्ये पक्षाची कामगिरी समाधानकारक न राहिल्याने, काही मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यामध्येही अपेक्षित यश मिळाले नाही.

राज्यभर फिरून प्रचार केला

शिंदे यांनी स्वतः राज्यभर फिरून प्रचार केला होता,मात्र काही मंत्री आपल्या जिल्ह्यांत असूनही पक्षाला यश मिळवून देऊ शकले नाहीत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकार्यक्षम मंत्र्यांना पदावरून दूर करून नव्या आणि सक्रिय नेत्यांना संधी दिली जाऊ शकते.

दरम्यान, इच्छुक नेते मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असून, पक्षात लॉबिंगही सुरू असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

पत्रकार परिषदेनंतर पक्षात नाराजी

दीपक केसरकरयांच्या अलीकडील पत्रकार परिषदेनंतर पक्षात नाराजी वाढीला असून, वरिष्ठांकडून त्यांना समज देण्यात आल्याचेही समजते. चुकीच्या व्यक्तींशी संपर्क आणि निर्णय प्रक्रियेबाबत अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात कडक कारवाईची मागणीही पक्षातील वरिष्ठांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts