• Home
  • राजकारण
  • भोंदू अशोक खरातच्या लेकीच्या लग्नात कोणत्या राजकीय नेत्यांनी लावलेली हजेरी? पाहुण्यांच्या यादीत मोठी नावं समोर
Top News

भोंदू अशोक खरातच्या लेकीच्या लग्नात कोणत्या राजकीय नेत्यांनी लावलेली हजेरी? पाहुण्यांच्या यादीत मोठी नावं समोर

kharat daughetr wedding

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदुबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातला नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अटक केली आहे. यानंतर अनेक पीडित महिलांनी अशोक खरातविरोधात लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. एसआयटीच्या या तपासात दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहे.

हेही वाचा – अशोक खरातच्या बंगल्यावर एसआयटीची धाड; पत्नी फरार, मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

खरातच्या लेकीच्या लग्न पत्रिकेत कोणत्या राजकीय नेत्यांची नावे छापण्यात आलेली?

ढोंगीबाबा अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, बड्या उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. खरातला भेटण्यासाठी अनेक राजकीय नेते त्याच्याकडे येत होते. तर आता अशोक खरातच्या लेकीच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिका एसआयटीच्या हाती लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पत्रिकेत अनेक राजकीय नेत्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ढोंगी खरातच्या लेकीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची नावे प्रमुख पाहुणे म्हणून छापण्यात आली होती. तर अनेक नेत्यांनी या लग्नाला प्रत्यक्षात हजेरी लावल्याची माहिती देखील समोर आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, रूपाली चाकणकर, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर या नेत्यांची नावे छापण्यात आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात आचा एकच खळबळ उडाली आहे.

ashok kharat daughter marriage invite

या निमंत्रण पत्रिकेबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला खरातच्या लेकीच्या लग्नाबाबत काहीही माहिती नाही. तसेच संबंधिताने पत्रिकेवर नाव टाकताना मला विचारले होते की नाही, याबाबतही मला माहिती नाही. त्या पत्रिकेवर माझे नाव होते हे मला आत्ताच कळले आहे, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं

दरम्यान, एसआटीच्या तपासात ही निमंत्रण पत्रिका सापडली असून एकच खळबळ उडाली आहे. तर या लग्नसोहळ्यात फक्त राज्यातीलच नाही तर दिल्लीसह अनेक परदेशी पाहुण्यांनी देखील उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता खरातच्या लेकीच्या लग्नाला नेमकं कोण कोण आलं होतं? याबाबतचा तपास सध्या एसआयटीकडून केला जात आहे. तर लग्नात हजेरी लावणाऱ्या सर्व नेत्यांनी चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts