• Home
  • देश
  • भारताला मोठा दिलासा! 3 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर LPG टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी
Top News

भारताला मोठा दिलासा! 3 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर LPG टँकरने पार केली होर्मुझ सामुद्रधुनी

lpg

Indian LPG Tanker | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. वाढत्या संघर्षामुळे या तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकिकडे अमेरिका इराणवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे. तर दुसरीकडे इराणकडूनही अमेरिकेवर जोरदार प्रतिहल्ला केला जात आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा (Hormuz Strait) मार्ग बंद केला आहे. त्यामुळे या सामुद्रधुनीत अनेक देशांचे तेलाचे आणि गॅसचे जहाज अडकून पडले आहेत. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. मात्र, आता भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – भोंदू अशोक खरातच्या लेकीच्या लग्नात कोणत्या राजकीय नेत्यांनी लावलेली हजेरी? पाहुण्यांच्या यादीत मोठी नावं समोर

भारताच्या एलपीजीने भरलेल्या जहाजाने सुरक्षितरित्या पार केली होर्मुझची सामुद्रधुनी

भारतीय ध्वज असलेल्या एलपीजीने भरलेल्या एका जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितरित्या पार केली आहे. ‘पाईन गॅस’ असं या जहाजाचं नाव आहे. तर हे जहाज युद्ध सुरू होण्याअगोदर 28 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या रूवैस बंदरामध्ये येणार होते आणि ते एका आठवड्याच्या आत भारतात पोहोचण्याची शक्यता होती. मात्र, युद्ध सुरू झाले आणि हे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून पडले होते.

इराणने आपल्या मित्र देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुतनीतून बाहेर पडण्यासाठी परवानगी दिली आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. तर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी काही निवडक जहाजांनाच परवानगी दिली आहे. त्यामुळे ‘पाईन गॅस’ या एलपीजीने भरलेल्या जहाजाला ही सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागला. हे जहाज भारतात एका आठवड्यात पोहचत होते, मात्र आता ते तीन आठवड्यांनंतर सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहे.

या जहाजाबाबत गॅस चीफ ऑफिसर सोहन लाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय एलपीजी जहाजावर कार्यरत असणारे 27 कर्मचारी तीन आठवडे भीतीच्या छायेत राहिले होते. जेव्हा ते होर्मुझ सामुद्रधुनीत अडकले होते तेव्हा त्यांना दररोज त्यांच्या डोक्यावरून ड्रोन, क्षेपणास्त्रे उडताना दिसत होते. तर भारतीय अधिकाऱ्यांनी जहाजातील कर्मचाऱ्यांना 11 मार्चच्या सुमारास निघण्यासाठी तयार राहण्यास सांगितले होते. मात्र, नंतर युद्ध इतके वाढले की जहाजाला 23 मार्चपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीतून पुढे जाण्याची परवानगी मिळाली नाही. नंतर इराणच्या सैन्याने भारतीय जहाजाला इराणी किनाऱ्याजवळील लारक बेटाच्या उत्तरेकडील अरूंद खाडीतून जाण्याची परवानगी दिली आणि हे जहाज सुरक्षितरित्या भारतात पोहोचले, अशी माहिती सोहन लाल यांनी दिली.

दरम्यान, ‘पाईन गॅस’  हे एलपीजीने भरलेले जहाज भारतात सुरक्षितपणे पोहोचले आहे. त्यामुळे भारताला आता मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts