Maharashtra Water Resources Jobs: अनेक परीक्षार्थींना आनंदाची बातमी आहे. आता जलसंपदा विभागात १५३४ रिक्त पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. चला जाणून घेऊयात याबाबत अधिक सविस्तर माहिती
राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकरीसाठी संधी मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणात भरती करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन विविध विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिले आहे.
हेही वाचा: प्रँक नाही, मदत करा! एप्रिल फूल डे टिप्स जाणून घ्या एका क्लिकवर
कर्मचारी संघटनांनी भरती प्रक्रियेत कंत्राटी पदांचा वापर टाळावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार, जलसंपदा विभागातील नोकरीसाठीचे निर्णय आणि प्रक्रियाही अंतिम टप्प्यावर आहेत.
रिक्त पदांची माहिती
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): १५३४ पदे
कनिष्ठ अभियंता (विद्युत): १४२ पदे
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): २७८ पदे
ही अधिकृत माहिती जलसंपदा विभागाने माहिती अधिकार अधिनियमान्वये दिली आहे.
सेवानियम आणि भरती प्रक्रिया
सुधारित सेवाप्रवेश नियमांची तयारी पूर्ण झाल्यानंतर, जलसंपदा विभागात भरती प्रक्रिया सुरू होईल. जर माहिती अधिकाराद्वारे दिलेली माहिती आपल्याला अपूर्ण वाटली, तर अपील करण्यासाठी मंगेश बागडे, अवर सचिव व अपिलीय प्राधिकारी, जलसंपदा विभाग, १५ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२, यांच्याकडे ३० दिवसांत अर्ज करता येईल.












