• Home
  • ताज्या बातम्या
  • १०वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! सशस्त्र सीमा बलात ८२७ पदांसाठी भरती सुरू; पाहा अर्ज कसा करावा
Top News

१०वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! सशस्त्र सीमा बलात ८२७ पदांसाठी भरती सुरू; पाहा अर्ज कसा करावा

Armed Border Force Recruitment 2026

Armed Border Force Recruitment 2026: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सशस्त्र सीमा बलात (SSB) कॉन्स्टेबल ट्रेड्समन आणि ड्रायव्हर पदांसाठी एकूण ८२७ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका. कारण सशस्त्र सीमा बलात (SSB) कॉन्स्टेबल ट्रेड्समन आणि ड्रायव्हर पदांसाठी एकूण ८२७ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यात ड्रायव्हर, व्हेटरनरी,गार्डनरसह अनेक विविध पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा: Maharashtra Education: मोठा निर्णय! नववी-दहावीचे वर्ग बंद होण्याची शक्यता; काय आहेत नवे नियम?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २१ मार्च २०२६ पासून सुरु झाली असून २० एप्रिल ही शेवटची तारीख आहे. इच्छुक अन् पात्र उमेदवारांनी ssb.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता आणि अधिक माहिती देखील पाहू शकतात.

पदांची अधिक माहिती

कॉन्स्टेबल (ड्रायव्हर): ५५३
कॉन्स्टेबल (व्हेटरनरी): ३४
कॉन्स्टेबल (गार्डनर): ४१
कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर): ५
कॉन्स्टेबल (मोची): २५
कॉन्स्टेबल (टेलर): ४१
कॉन्स्टेबल (धोबी): ७४
कॉन्स्टेबल (नाई):४३
कॉन्स्टेबल (वेटर): ३
कॉन्स्टेबल (बढई): ७
कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डरली): १

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल ३ नुसार वेतन मिळणार आहे. जे २१,७०० पासून ते ६९,१०० पर्यंत जाऊ शकते. याशिवाय इतर भत्तेही मिळतील.

अर्ज शुल्क

सामान्य / EWS / OBC: १००
SC / ST / माजी सैनिक / महिला: शुल्क नाही

निवड प्रक्रिया

फिजिकल टेस्ट: शारीरिक क्षमता आणि मानक तपासणी
लेखी परीक्षा: १०० प्रश्न, १२० मिनिटांचा कालावधी, निगेटिव्ह मार्किंग
स्किल टेस्ट: ट्रेड्समन व ड्रायव्हरसाठी
डॉक्युमेंट पडताळणी
मेडिकल तपासणी

लेखी परीक्षेतील विषय

सामान्य ज्ञान, गणित, रीजनिंग आणि भाषा

अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाइट ssb.gov.in वर जा
“Constable Tradesman/Driver Apply” लिंकवर क्लिक करा
ईमेल व मोबाईल नंबरने नोंदणी करा
लॉगिन करून फॉर्म भरा
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
ऑनलाइन अर्ज शुल्क भरा
फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट/डाउनलोड ठेवा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts