गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पीय पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ होऊ लागली आहे. बीड आणि माजलगावचा पाणी पुरवठा अवलंबून असलेले माजलगाव धरण 83% टक्के भरले आहे. पाण्याची आवक अजूनही वेगाने सुरूच असून अवघ्या 24 तासामध्ये 9 टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. लवकरच माजलगाव धरण 100 टक्के भरेल असा अंदाज व्यक्त केला आहे.












