मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा उपोषणाचा चौथा दिवस असून आजपासून त्यांनी पाणी न पिण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर मुंडन करून आंदोलनात अनोखा सहभाग दर्शवला. आझाद मैदानावर काही ठिकाणी आंदोलक कब्बडी, खो-खो, फुगडी यांसारखे महाराष्ट्रीय खेळ खेळताना व CSMT स्थानकावर सूर्यनमस्कार करताना दिसून आले.












