Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन? अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू
गुन्हा

नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z आंदोलन? अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू

नेपाळच्या काही भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Nepal Gen-Z protests  : नेपाळमध्ये Gen-Z निदर्शनं पुन्हा सुरु झाली आहेत, ज्यामुळं देशाच्या काही भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यापूर्वी, सप्टेंबरमध्ये, एका प्राणघातक “Gen-Z” उठावामुळं तत्कालीन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सरकार उलथून पडलं होतं. त्यानंतर माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. आता, माजी सत्ताधारी पक्षाच्या निष्ठावंत आणि तरुण निदर्शकांमध्ये नवीन संघर्ष सुरु झाले आहेत. नव्यानं सुरू झालेल्या युवा चळवळीमुळं देशातील बारा जिल्ह्यात मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. Gen-Z सदस्य आणि माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) च्या समर्थकांमध्ये थेट संघर्ष झाल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली.

हेही वाचा – बिश्नोईचा भाऊ अनमोल भारतात दाखल; बाबा सिद्दीकी हत्यांकांडाचा लवकरच होणार उलगडा?

हिंसक संघर्षांमुळं कर्फ्यू लागू

बुधवारी नेपाळमधील परिस्थिती अचानक बिघडली जेव्हा तरुण निदर्शक आणि सीपीएन-यूएमएल कार्यकर्त्यांनी बारा जिल्ह्यातील सिमरा भागात रॅली काढल्या. दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरु झाला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून विमानतळाजवळ आणि इतर अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू केला. सुव्यवस्था पूर्ववत करण्याची गरज असल्याचं सांगून जिल्हा प्रशासनानं गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) रात्री 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील असं सांगितलं.

नेपाळच्या कार्यवाहक पंतप्रधानांचं शांततेचं आवाहन

नेपाळच्या कार्यवाहक पंतप्रधान सुशीला कार्की यांनी Gen-Z निदर्शकांना शांततेचं आवाहन केलं आहे. नेपाळमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या उठावानंतर सुशीला यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कार्की यांनी तरुणांसह सर्व पक्षांना “अनावश्यक राजकीय चिथावणी देण्यापासून दूर राहण्याचं” आणि 5 मार्च 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते अबी नारायण काफले यांनी गुरुवारी सांगितलं की “परिस्थिती सामान्य आहे, कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही.”

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts