Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • पंढरपूर कॉरिडॉरला वेग! आज महत्त्वाची बैठक, अर्थसंकल्पात निधीकडे लक्ष
Top News

पंढरपूर कॉरिडॉरला वेग! आज महत्त्वाची बैठक, अर्थसंकल्पात निधीकडे लक्ष

Pandharpur Corridor

Pandharpur Corridor : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच पंढरपूर कॉरिडॉरच्या हालचालींना वेग आला असून आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या कॉरिडॉरसाठी अर्थसंकल्पात किती निधी मंजूर होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार दोन्ही सभागृह

विठ्ठल दर्शनासाठी वर्षभरात कोट्यवधी भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. या भाविकांना सुखकर दर्शन, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, निवास आणि सुरक्षिततेच्या अधिक चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठीच हा भव्य कॉरिडॉर उभारण्याची योजना आहे. आषाढी यात्रेपूर्वीच कॉरिडॉरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवासी यांना विश्वासात घेऊनच सर्व कामे केली जाणार असल्याचे प्रशासनाने जरी स्पष्ट केले असले तरी कॉरिडॉरची नेमकी रचना, मार्ग आणि टप्प्यांबाबत अद्याप गोपनीयता पाळली जात आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये उत्सुकतेसोबतच काही प्रमाणात संभ्रमही कायम असला तरी भाविकांच्या सोयींच्या दृष्टीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, आज २३ फेब्रुवारीच्या बैठकीत प्रकल्पाचा आराखडा, निधी, जमीन संपादन, कामाचा कालावधी यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर कॉरिडॉरसाठी मोठा निधी जाहीर होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts