Sharad Pawar health update : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार 9Sharad Pawar) यांना काल पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल शरद पवार यांना उलट्यांचा त्रास होऊन डिहायड्रेशन झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने (Doctor’s advice) दाखल करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट (Health update) समोर आली आहे.
48 तासांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार
शरद पवारांना पुढील 48 तासांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. “पवार साहेबांची तब्बेत आता एकदम चांगली आहे. त्यांनी चांगला आराम केला आहे आणि परवा ते घरी जाणार आहेत. ते पुढचे काही दिवस पुण्यात राहणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला परत जाणार आहेत. पुढेच दोन दिवस त्यांना आराम करावा लागणार आहे. ते व्यवस्थित खात आहेत. चांगला नाश्ता करत आहेत आणि सर्व काही ठिक आहे. त्यांचे सगळे रिपोर्ट्स चांगले आले आहेत. त्यांची सगळी तपासणी झाली आहे. सर्व काही स्थिर आहे कोणतीही काळजी करण्याची गरज नाही”, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली
शरद पवार यांना उलट्या सुरु झाल्या होत्या. उलट्या होत असल्यामुळे त्यांना डीहायड्रेशन झाले होते. त्यांना सलाइन लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. तसेच सिटीस्कॅन देखील करण्यात आले आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आता पुढच्या 48 तासात त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती पुन्हा आज डॉक्टरांनी दिली आहे.
मागील आठवड्यात बारामतीवरून पुण्याला आणण्यात आले
यापूर्वीही शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात त्यांच्या छातीत कफ झाल्याने त्यांना बारामतीवरून पुण्याला आणण्यात आले होते. पाच दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती, मात्र आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना पुढच्या 48 तासात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.












