Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • शुभमंगल सावधान! रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी बांधली लग्नगाठ, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
ताज्या बातम्या

शुभमंगल सावधान! रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी बांधली लग्नगाठ, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

Rashmika Mandanna And Vijay Deverkonda Wedding |दाक्षिणात्य सेनिसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी आज सकाळी उदयपूरमध्ये हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. वैदिक मंत्र आणि वाद्यांच्या गजरात दोघांनी लग्नगाठ बांधली. या खास लग्नसोहळ्याला विजय-रश्मिकाचे कुटुंबीय आणि काही मोजके पाहुणे उपस्थित होते.

हेही वाचा – सुशांतच्या मुद्यावर एवढा गदारोळ केला, मग अजित पवारांचं काय? रोहित पवारांचा संतप्त सवाल

हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर विजय आणि रश्मिका पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. ते दोघं दुपारी 4.30 वाजता कोडाव परंपरेनुसार पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. तसेच या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोचो अद्याप समोर आलेले नाहीयेत. मात्र, त्यांच्या हळदीचे काही फोटो स्वत: विजय आणि रश्मिकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

कुठे पार पडलं रश्मिका-विजयचं लग्न?

रश्मिका आणि विजयचा हा खास लग्नसोहळा उदयपूरमधील अरावलीमध्ये आयटीसी हॉटेल्स द मोमेंटोसमध्ये पार पडला. विशेष म्हणजे त्यांनी या लग्नसोहळ्याला ‘वेडिंग ऑफ VIROSH’ असं नाव दिलं आहे. तसेच विजय आणि रश्मिका लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून चाहत्यांनी त्यांच्यावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, विजय आणि रश्मिकाने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांनी ‘डिअर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. विशेष म्हणजे ‘गीता गोविंदम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजय आणि रश्मिका एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर ते दोघे एकमेकांना गुपचूप डेट करत होते. तर आता अखेर या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी देत एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे.

 

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts