• Home
  • मनोरंजन
  • विजय रश्मिका फेब्रुवारीत बांधणार लग्नगाठ; उदयपूरमध्ये होणार विवाह
मनोरंजन

विजय रश्मिका फेब्रुवारीत बांधणार लग्नगाठ; उदयपूरमध्ये होणार विवाह

Actors Vijay Deverakonda and Rashmika Mandanna ahead of their wedding

Vijay Rashmika wedding : मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंदा यांच्या रिलेशनशिप बद्दल चर्चा रंगली होती. आता दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली असून लग्नाची तारीख देखील ठरली आहे. त्यानुसार येणाऱ्या वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं 26 फेब्रुवारी 2026 रोजी विवाह होणार आहे. याबाबत दोघांकडून देखील अधिकृत माहिती मिळालेली नसून या दोघांच्या लग्नाची तारीख सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना 26 फेब्रुवारी 2026 रोजी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न करणार आहेत. विजयच्या जवळचे मित्र त्यांच्या लग्नाची प्लॅनिंग करत आहेत. हे लग्न साउथ आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार असून हैदराबाद येथे विजय आणि रश्मिका यांचा साखरपुडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांची पहिली भेट 2018 मध्ये गीता गोविंदम या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी प्रेक्षकांना दोघांचीही केमिस्ट्री अत्यंत भावली होती. त्यानंतर त्यांनी डीअर कॉम्रेड या चित्रपटात एकत्र दिसले. प्रेक्षकांना ही जोडी आता खऱ्या आयुष्यात देखील पाहायला मिळेल. परंतु अद्याप देखील रश्मिका मंधाना आणि विजय देवरकोंडा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नसली तरीही सोशल मीडियावर मात्र अफाट चर्चा सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts