छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडवी गावातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मंतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयात एक चिमकल्याला शिपायाकडून अमानुष मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याचे हात पाठीमागे बांधलेले आहेत. तसेच शिपाई त्याला बेदम मारहाण करत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे आणि संताप आल्याशिवाय राहणार नाही.
या चिमुकल्या मतिमंद विद्यार्थ्याला त्याच्या वेदनाही सांगत येत नाहीत. या अमानवी कृत्यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तर संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात हा प्रकार घडला आहे. या विद्यालयातील एका लहान मुलाला शिपाई दीपक इंगळे याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
संभाजीनगरमध्ये शिपायाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण pic.twitter.com/c5GDcDmdTD
— Namdeo kumbhar (@kumbharnc57) November 3, 2025
विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप
दरम्यान, मतिमंद विद्यार्थ्यांवर होत असलेली ही अमानुष वागणूक समाज मनाला वेदना देणारी आहे. हा प्रकार समोर कसा आला आणि याबाबत सर्वात आधी प्रशासनाकडे तक्रार करणारे प्रतिम घंगाळे यांनी विद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिव्यांग आयुक्तांना हा व्हिडीओ पाठवला, मग सगळी सूत्र हलली. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण
केवळ हाच प्रकार नाही तर या विद्यालयात इतर विद्यार्थ्यांनाही अत्याचाराला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे. विद्यालयातील केअरटेकर प्रदीप देहाडे याने देखील विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचं आरोप करण्यात आलं आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रदीप देहाडे हा विद्यार्थ्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांना मारहाण करत आहेत.












