Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद; ‘या’ शेअर्समध्ये लक्षणीय घसरण
ताज्या बातम्या

शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद; ‘या’ शेअर्समध्ये लक्षणीय घसरण

मुंबई : भारतीय शेअर बाजार आज पुन्हा एकदा घसरणीसह लाल रंगात बंद झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, बीएसई सेन्सेक्स 54.30 अंकांनी (0.06%) घसरुन 85,213.36 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 19.65 अंकांनी (0.08%) घसरुन 26,027.30 वर बंद झाला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार वाढीसह बंद झाला होता हे लक्षात घेतलं पाहिजे. मात्र, गेल्या आठवड्यात सुरुवातीच्या सत्रात घसरण झाल्यामुळं बाजार तोट्यासह बंद झाला.

सेन्सेक्सच्या 30 पैकी 16 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद :

सोमवारी, सेन्सेक्सच्या 30 पैकी फक्त 14 कंपन्यांनी वाढीसह हिरव्या रंगात बंद केले, तर उर्वरित 16 कंपन्या तोट्यासह लाल रंगात बंद झाल्या. त्याचप्रमाणे, निफ्टी 50 मधील 50 कंपन्यांपैकी फक्त 22 कंपन्या वाढीसह हिरव्या रंगात बंद झाल्या, तर उर्वरित 27 कंपन्या तोट्यासह लाल रंगात बंद झाल्या आणि एक कंपनी अपरिवर्तित बंद झाली. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स सर्वाधिक 1.37 टक्के वाढीसह बंद झाले आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक 1.92 टक्के घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सच्या उर्वरित कंपन्यांनी आज कशी कामगिरी केली? :

सेन्सेक्सच्या उर्वरित कंपन्यांमध्ये, ट्रेंट 1.11 टक्के, एचसीएल टेक 0.68 टक्के, इन्फोसिस 0.57 टक्के, एशियन पेंट्स 0.53 टक्के, टाटा स्टील 0.52 टक्के, टीसीएस 0.42 टक्के, एल अँड टी 0.40 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.37 टक्के, आयटीसी 0.37 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 0.33 टक्के, बीईएल 0.28 टक्के, इटरनल 0.08 टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीज 0.02 टक्के वाढीसह बंद झाले.

कोणते शेअर्स घसरले :

दुसरीकडे, सोमवारी मारुती सुझुकीचे शेअर्स 0.89 टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स 0.81 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 0.75 टक्क्यांनी, टायटन 0.64 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 0.56 टक्क्यांनी, भारती एअरटेल 0.54 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 0.53 टक्क्यांनी, पॉवरग्रिड 0.53 टक्क्यांनी, एनटीपीसी 0.37 टक्क्यांनी, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स 0.30 टक्क्यांनी, अल्ट्राटेक सिमेंट 0.25 टक्क्यांनी, टेक महिंद्रा 0.15 टक्क्यांनी, आयसीआयसीआय बँक 0.11 टक्क्यांनी, अ‍ॅक्सिस बँक 0.10 टक्यांनी आणि सन फार्मा स्टॉक 0.01 टक्क्यांनी घसरले.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts