Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • निवडणुकींचे बिगूल वाजलं! २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर, १६ ला मतमोजणी
Top News

निवडणुकींचे बिगूल वाजलं! २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर, १६ ला मतमोजणी

29 municipal corporations Election

Municipal elections announced : राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यातील एकूण 29 महानगरपालिकेच्या निडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूकांकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं होत. 29 महापालिकांच्या निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची तारीख 23 डिसेंबर पासून 3 डिसेंबरपर्यंत असणार आहे. तर मतदान प्रक्रिया १५ जानेवारी रोजी पार पडणार असून मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहे.

हेही वाचा – मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी मैत्रीपुर्ण लढत

राज्य निवडणूक आयोगाची आज सह्याद्री अतिथीगृह येथे ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29 महापालिकांसह अन्य स्थानिक निवडणुका गेल्या 5 ते 7 वर्षापासून प्रलंबित होत्या. त्यानंतर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्याने घेत आहे.

असे असणार महापालिकांचे संपूर्ण वेळापत्रक

आज दिनांक १५ डिसेंबरपासून संपूर्ण मतदान प्रक्रियेपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान असणार आहे.

अर्ज छाननी प्रक्रिया – 31 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

उमेदवारी माघारी घेण्याची मुदत – 2 जानेवारी 2026 असणार आहे.

चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येतील.

मतदान प्रक्रिया – 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे.

मतमोजणी – 16 जानेवारीला होणार आहे.

जालना आणि इचलकरंजी दोन नवीन महापालिका

राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाची तयार

एकूण मतदार – 3 कोटी 48 कोटी
एकूण मतदार केंद्र – 39 हजार 147
मुंबईसाठी मतदार केंद्र – 10 हजार 111
कंट्रोल यूनिट – 11 हजार 349
बॅलेट यूनिट – 22 हजार 000

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts