Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आनंद हिरावला सोशल मीडियाने; किशोरवयीन मुलांना ग्रासले नैराश्याने
Top News

आनंद हिरावला सोशल मीडियाने; किशोरवयीन मुलांना ग्रासले नैराश्याने

social media

social media: मोबाईल (mobile) आज शरीराचा एक अविभाज्य अंग बनला आहे. त्या मोबाईलमध्ये अनेक फीचर्स असतात. त्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत. परंतु मोबाईलच्या अति वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये teenager) धोका वाढत असल्याचा अहवाल (report) आला आहे. ‘जागतिक आनंद अहवाल २०२६’ ने (World Happiness Report 2026) आता ही चिंता अधिक गंभीर केली आहे. त्यामुळे चिंता, नैराश्य आणि घटलेले जीवन समाधान यांसारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. परिणामी सोशल मीडिया शाप की वरदान असा सवाल निर्माण होत आहे.

हे ही वाचा: कुणी काम देता का काम ..! देश तरुणांचा; परंतु ४० टक्के पदवीधरांच्या हाताला काम नाही

तणावाची लक्षणे

किशोरवयीन मुलामुलींचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यांच्या मानसिक आरोग्यातही घट झाली आहे. विशेषतः, जी मुले दिवसातून ५ तास किंवा त्याहून अधिक वेळ सोशल मीडियावर घालवतात, त्यांच्यामध्ये तणाव आणि नैराश्याची लक्षणे दिसून येत आहेत. सोशल मीडिया म्हणजे अशी सर्व प्लॅटफॉर्म्स जिथे वापरकर्त्यांची प्रोफाइल, सामग्रीची देवाणघेवाण आणि संवाद साधला जातो. यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक, यूट्यूब आणि ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा समावेश होतो.

मुलांच्या वर्तनावर परिणाम

अहवालानुसार, २०१० च्या सुमारास तरुणांच्या आनंदात घट होण्यास सुरुवात झाली, जेव्हा स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला. याच काळात मुलांचे सामाजिक जीवन हळूहळू ऑफलाइनवरून ऑनलाइनकडे वळू लागले. तज्ञांच्या मते, या बदलाचा मुलांच्या वर्तनावर, विचारांवर आणि मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.

मानसिकदृष्ट्या कमकुवत

या समस्येचा किशोरवयीन मुलींवर अधिक परिणाम होत आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे त्यांना कमी आत्मविश्वास, शारीरिक असमाधान, चिंता आणि नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता जास्त असते. अल्गोरिदमवर आधारित सामग्री, इन्फ्लुएन्सर संस्कृती आणि इतरांशी सतत तुलना करण्याची सवय मुलांना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवू शकते.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts